पोप फ्रान्सिस म्हणतात, कॅथलिक धार्मिक नेत्यांनी नन्सचं लैंगिक शोषण केलं

फोटो स्रोत, EPA
आखाती देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी धर्मगुरू नन्सचं लैंगिक शोषण करत असल्याची बाब मान्य केली आहे.
या संबंधित एक प्रकरण असंही होतं, ज्यामध्ये ननला सेक्ससाठी गुलाम म्हणून ठेवण्यात आलं होतं.
पोप फ्रान्सिस यांच्याअगोदरचे पोप बेनडिक्ट यांना धर्मगुरू शोषण करत असलेल्या नन्सच्या धर्मसभेला बंद करावं लागलं होतं, हेसुद्धा पोप त्यांनी मान्य केलं आहे.
पोप फ्रान्सिस यांनी धर्मगुरुंकडून नन्स म्हणजेच ख्रिस्ती जोगतिनींच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाची बाब पहिल्यांदाच मान्य केली आहे, असं म्हटलं जात आहे.
"चर्च या समस्येवर उपाय शोधत आहे, पण ही समस्या आजही भेडसावत आहे," असं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे.
पोप फ्रान्सिस सध्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी जोगतिनींच्या लैंगिक शोषणासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
"लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमुळे अनेक धर्मगुरुंना निलंबित करण्यात आलं आहे. पण यासाठी अधिक प्रयत्न गरजेचे आहेत," असं त्यांनी म्हटलं आहे.
समस्येविषयी माहिती
"धर्मगुरू नन्सचं शोषण करत आहेत, ही बाब चर्चला माहिती आहे आणि चर्च यावर काम करत आहे. यावर काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत," असं त्यांनी म्हटलं आहे.
"पोप बेनडिक्ट यांनी महिलांच्या एका धर्मसभेला संपुष्टात आणण्याचं धैर्य दाखवलं, कारण धर्मगुरुंनी या महिलांना तिथं सेक्ससाठी गुलाम म्हणून ठेवलं होतं," त्यांनी पुढे सांगितलं आहे.
"ही समस्या आजही आहे, पण धर्मसभा आणि विशेष क्षेत्रांमध्ये ही समस्या प्रकर्षानं भेडसावत आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Reuters
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात 'कॅथलिक चर्च ग्लोबल ऑर्गनायझेशन फॉर नन्स'नं गप राहणं आणि गोपनीयता ठेवण्याच्या परंपरेची निंदा केली होती. ही परंपरा नन्सना त्यांचं म्हणणं मांडण्यापासून रोखते, असं त्यांचं म्हणणं होतं.
काही दिवसांपूर्वी व्हॅटिकनमधील महिलांविषयक वर्तमानपत्र 'वूमेन चर्च वर्ल्ड'नं लैंगिक शोषणाची निंदा करत म्हटलं होतं की, "काही प्रकरणांत नन्सच्या पोटात धर्मगुरुंचे गर्भ वाढत होते. यामुळे नन्सना बळजबरीनं गर्भपात करावा लागला. कॅथलिक पंथात गर्भपात करण्यास मनाई आहे."
#MeToo या मोहिमेनंतर अधिक महिला त्यांच्याविषयीच्या घटनाबद्दल बोलत आहेत, असं या वर्तमानपत्रानं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








