You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शॉन कॉनरीः जेम्स बॉंड साकारणाऱ्या अभिनेत्याचं निधन
रुपेरी पडद्यावर जेम्स बाँडची व्यक्तिरेखा अजरामर करणारे अभिनेते सर शॉन कॉनरी यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. ते 90 वर्षांचे होते.
मूळचे स्कॉटलँडचे असलेले शॉन कॉनरी यांनी जेम्स बाँडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शॉन कॉनरी हेच पहिल्यांदा जेम्स बाँड हे पात्र रंगवताना रुपेरी पडद्यावर दिसले होते. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी सलग सात चित्रपटांमध्ये जेम्स बाँड या गुप्तहेराची भूमिका केली.
त्याशिवाय त्यांनी पुढची अनेक दशके चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांना एक ऑस्कर, दोन बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते, हे विशेष.
1988 साली त्यांना 'द अनटचेबल्स' चित्रपटातील आयरिश पोलिसाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
2000 साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
गेल्या ऑगस्ट महिन्यातच शॉन कॉनरी यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली होती.
सर कॉनरी यांनी 50 दशकं विविध चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या जेम्स बाँड चित्रपटांसह रेड ऑक्टोबर, हायलँडर, इंडियाना जोन्स, द लास्ट क्रुसेड आणि द रॉक या चित्रपटांनी उल्लेखनीय यश मिळवलं. सर कॉनरी मूळचे स्कॉटलँडची राजधानी एडिनबर्गच्या फाऊंटनब्रीजचे होते. त्यांनी सर्वप्रथन 1962 मध्ये डॉ. नो या चित्रपटात जेम्स बाँड हे पात्र साकारलं. हे सत्र पुढे सहा चित्रपटांपर्यंत सुरू होतं. यात पाच अधिकृत जेम्स बाँडपट आणि 1983 ला आलेल्या नेव्हर से नेव्हर अगेन या चित्रपटांचा समावेश आहे.
बाँड चित्रपटांचे निर्माते मायकल जी विल्सन आणि बार्बरा ब्रोकोली यांनी सीन कॉनरी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. शॉन कॉनरी यांचं नेहमीच स्मरणात राहिल शॉन हे ओरिजिनल बाँड होते. त्यांनी या भूमिकेला ऐतिहासिक बनवलं. त्यांचा माय नेम इज बाँड....जेम्स बाँड हा डायलॉग या चित्रपटाचीच ओळख बनला, असं ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)