किम जाँग-उन यांनी माफी का मागितली?

किम जोंग उन

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी माफी मागितल्याचा दुर्मिळ प्रकार घडला आहे.

दक्षिण कोरियन नागरिकाच्या हत्येप्रकरणी किम जाँग-उन यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती दक्षिण कोरिया राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने दिली. जे काही घडलं तो प्रकार घडायला नको होता, असं किम जाँग-उननी म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं.

दक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे 47 वर्षीय नागरिक कथितरित्या उत्तर कोरियामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आढळून आले. त्यांनी सागरी सीमेत प्रवेश करताच नॉर्थ कोरियाच्या सुरक्षा दलाकडून त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह तसाच समुद्रात फेकून देण्यात आला, असंही दक्षिण कोरियाने म्हटलं.

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर कडक सुरक्षा बंदोबस्त आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी उत्तर कोरियाने सीमेवर दिसताक्षणीच गोळी घालण्याचे आदेश लष्कराला दिले आहेत.

दक्षिण कोरियन नागरिकाच्या मृत्यूबद्दल किम जाँग-उन यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जो इन यांना एक पत्र पाठवलं आहे.

सदर घटना घडायला नको होती, या घटनेबाबत अतिशय दुःख झालं असून आपण त्याबाबत खेद व्यक्त करतो, असं किम जाँग-उन यांनी म्हटलं आहे.

उत्तर कोरियाने सबंधित घटनेबाबत आणखी काही माहितीही दक्षिण कोरियाला दिली. मृत नागरिकावर 10 गोळ्या झाडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)