कोरोना व्हायरस : गरीब आता आणखीच गरीब होणार - जागतिक बँक

भारत

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, करिश्मा वासवानी
    • Role, एशिया बिझनेस प्रतिनिधी

जागतिक बँकेनं पूर्व आशियातले देश आर्थिक आघाड्यांवर या वर्षी कसं काम करतील हे सांगणारा एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात कोरोनो व्हायरस या देशांच्या अर्थव्यवस्थांवर कसा परिणाम करेल तेही सांगितलं आहे.

परिस्थिती काही चांगली नाही. या व्हायरसने पर्यटन, व्यापार आणि आयात निर्यातींवर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थांना संकटात टाकलं आहे.

त्याहीपेक्षा वाईट म्हणजे यावर अवलंबून असणाऱ्या आशियातल्या सगळ्यांत गरीब लोकांच्या उपजीविकेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

या सगळ्याचा परिणाम म्हणून जगातले गरीब अधिकच गरीब होतील आणि श्रीमंत देशांनासुद्धा आपला व्यापार आणि देशांतर्गत व्यवहार टिकवण्यासाठी धडपड करावी लागेल.

भारत

फोटो स्रोत, Getty Images

चीनमध्ये, जिथे रोगाचं संक्रमण सुरू झालं, तिथे देशाची आर्थिक वाढ मंदावेल. गेल्यावर्षी चीनचा वृद्धी दर 6.1 टक्के होता, तिथून घसरून तो 2.3 टक्क्यांवर येईल.

तेही 2020 मध्ये या महामारीने अजून भीषण स्वरूप धारण केलं नाही तर. पण जर तसं झालं तर या वर्षीचा वृद्धी दर फक्त 0.1 टक्के इतकाच राहील.

कोरोना
लाईन

या महामारीचा सगळ्यांत वाईट परिणाम गरिबांवर होणार आहे.

एक म्हणजे गरीब या आजारांना बळी पडतील आणि दुसरं म्हणजे घसरत्या अर्थव्यवस्थेत त्यांच्या उत्पन्नाचं साधन त्यांच्यापासून हिरावून घेतलं जाईल.

बँकेच्या अंदाजानुसार, 2020 साली 2 कोटी 40 लाख गरीब लोक या व्हायरसच्या संक्रमणामुळे आपल्या गरिबीतून बाहेर पडू शकणार नाहीत, जे एरवी पडू शकले असते. याहीपेक्षा वाईट म्हणजे 1 कोटी 10 लाख लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले जातील.

आशिया, विशेषतः चीन, गेल्या दहा वर्षांत जगाचं आर्थिक इंजिन बनलं आहे. या इंजिनाच्या मदतीने जागतिक अर्थव्यवस्थांचा गाडा धावतो आहे. पण कोरोना व्हायरसमुळे हे इंजिनच आता घसरताना दिसतंय. यातून बाहेर पडण्याचा रस्ता कठीण असेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)