कोरोना व्हायरस : चीननं कसा आणला कोव्हिड-19चा संसर्ग आटोक्यात?

फोटो स्रोत, Getty Images
एक विषाणू चीनमधल्या एका स्थानिक बाजारातून जगभरात पोहोचून असा धुमाकूळ घालेल, याचा कुणी विचारही केला नव्हता.
डिसेंबरच्या मध्यात चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरायला सुरुवात झाली. हुबेई प्रांतातल्या वुहान शहरात कुण्या एका माणसाने एका जंगली प्राण्याचं मांस खाललं, आणि त्यामुळे हा विषाणू माणसांमध्ये आलं आणि त्यानंतर तो झपाट्याने आधी चीनच्या अनेक प्रांतात आणि मग जगभरात पसरला.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या संसर्गाला पँडेमिक, म्हणजेच जागतिक आरोग्य संकट म्हणत आहे. कारण आता चीनबाहेरही इटली, स्पेन, इराणसह 150 हून अधिक देशांमध्ये या विषाणूनं हातपाय पसरले. त्यामुळे काही ठिकाणी तर लॉक डाऊनचीही वेळ आली आहे.
पण जगाच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट म्हणजे ज्या चीनमधून हा विषाणू पसरायला सुरुवात झाली, तिथे आता या विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आलाय. गेल्या दोन दिवसांत चीनमध्ये नोंदवण्यात आलेली नवीन रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे.
पूर्वपदावर येतंय आयुष्य
चीनच्या वुहानसह इतर शहरांमध्ये आयुष्य आता हळूहळू पूर्वपदावर येतंय. नैऋत्य चीनमधल्या काही शाळा पुन्हा सुरू झालेल्या आहेत.

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा- कोरोना व्हायरस : शुभमंगल आता जरा जास्तच 'सावधान'
- वाचा-कोरोना व्हायरस असं पोखरतो रुग्णाचं शरीर
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

ज्या वुहान शहरातून या विषाणूच्या उद्रेकाला सुरुवात झाली तिथली परिस्थितीही आटोक्यात आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या वुहान शहराला नुकतीच भेट दिली. परिस्थिती नियंत्रणाखाली असून सारं पूर्वपदावर येत असल्याचे हे संकेत होते.
जिनपिंग यांच्या वुहान भेटीच्या दिवशी चीनमध्ये फक्त 19 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि यापैकी दोन रुग्ण बाहेरून आलेले होते. त्यामुळे हुबेई प्रांत आणि वुहानमध्ये आता हा संसर्ग 'आटोक्यात' आलेला असल्याचं शी जिनपिंग यांनी या भेटीदरम्यान जाहीर केलं.
'या संसर्गामुळे निर्माण झालेल्या सर्वात खडतर काळातून चीन बाहेर पडत असल्याचा संदेश जिनपिंग यांच्या वुहान भेटीमुळे साऱ्या देशाला आणि जगाला मिळाल्याचं' चीनच्या राष्ट्रीय माध्यमांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Reuters
कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना रुग्णांना उपचार देण्यासाठी उभारण्यात आलेली वा सुरू करण्यात आलेली चीनमधली सर्व 14 तात्पुरती हॉस्पिटल्स आता बंद करण्यात आली आहेत.
शांघायमधलं डिस्नेलँडही काही प्रमाणात पुन्हा सुरू झालंय. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे गेले महिनाभर बंद असलेली चीनमधली 'अॅपल स्टोअर्स'ही पुन्हा उघडलेली आहेत.
फेब्रुवारीच्या मध्यात अॅपल कंपनीने चीनमधली आपली 42 स्टोअर्स बंद केली होती. आता ही सगळी दुकानं पुन्हा सुरू झाली असून यातली काही स्टोअर्स ठराविक तासांसाठीच काम करत आहेत.
चीनने नेमकं काय केलं?
कोरोना विषाणू पसरायला लागल्यानंतर ज्या वुहान शहरातून याचा उद्रेक झाला तिथे येण्याजाण्यावर निर्बंध घालण्यात आले.
शहरातली 'अॅनिमल मार्केट्स' म्हणजे जिथे मासे-मांस-प्राण्यांची विक्री होते, असे बाजार बंद करण्यात आले. शाळा बंद करण्यात आल्या.
संपूर्ण हुबेई प्रांतच 'लॉकडाऊन' करण्यात आला. इथे येण्याची वा इथून बाहेर पडण्याची कोणालाही परवानगी नव्हती. काही काळाने हा विषाणू जिथे जिथे पसरला त्या सगळ्या शहरांत आणि प्रांतात ही पावलं उचलण्यात आली.
बीजिंग शहरातही दुकानं-बार-रेस्टॉरँट्स बंद होती, तर काही ठिकाणी एका टेबलवर फक्त तीन जणांना बसण्याची मर्यादा घालण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
निवासी भागांमध्ये कर्फ्यूची कठोर अंमलबजावणी करण्यात आली. विमानसेवा रद्द करण्यात आल्या, शाळा आणि कार्यालयंही बंद करण्यात आली.
रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चीनने देशभर 14 तात्पुरती हॉस्पिटल्स वेगाने उभी केली, तर अनेक ठिकाणी हॉटेल्सचा वापर रुग्णांच्या विलगीकरणासाठी (Quarantine) करण्यात आला.
चिनी नागरिकांना social distancing म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा, समाजजीवनापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
तंत्रज्ञानाची मदत
तंत्रज्ञानाच्याबाबतीत चीन इतर देशांपेक्षा अनेक बाबींमध्ये आघाडीवर आहे आणि कोरोना विषाणूशी लढताना या गोष्टींचा चीनला फायदा झाला.
निर्जंतुकीकरण करणारे रोबोज, आजूबाजूच्या लोकांच्या शरीराचं तापमान मोजणारी स्मार्ट हेल्मेट्स, थर्मल कॅमेरे, ड्रोन्स, फेशियल रेकग्निशन अशा सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात आला.
एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होऊ नये म्हणून अनेक चायनीय कंपन्यांनी 'कॉन्टॅक्टलेस' म्हणजे संपर्कात न येता कामं करण्यासाठीची प्रणाली विकसित केली. वस्तूंच्या डिलीव्हरी, औषधांची फवारणी, प्राथमिक निदान चाचण्या या मार्फत करण्यात आल्या.
शिवाय लागण झालेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी आणि हे लोक विलगीकरणाच्या नियमांचं पालन करत आहेत का ते तपासण्यासाठी तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलं.
चीनमधल्या सार्वजनिक स्थळांवर 'फेशियल रेकग्निशन' तंत्रज्ञान असलेले कॅमेरे लावण्यात आले आहेत. आता या तंत्रज्ञानाद्वारे गर्दीतील लोकांचा ताप तपासण्यात आला वा मास्क न घालणाऱ्यांना हेरण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
शिचुआन प्रांतातमध्ये चेंगरू शकतात अधिकाऱ्यांना अशी हेल्मेट्स देण्यात आली ज्याद्वारे 5 मीटरच्या परिघातल्या कोणाच्याही शरीराचा ताप त्यांना मोजता येत होता आणि नेहमीपेक्षा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान अधिक आढळल्यास हेल्मेटचा अलार्म वाजे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
बीजिंग शहरात अजूनही सबवे, रेस्टॉरंट्स आणि अपार्टमेंट्सजवळ नागरिकांच्या शरीराच्या तापमानाची नोंद केली जातेय. अजूनही लोक मास्क लावून वावरत असले तरी आता पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर यायला लागलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








