कोरोना: जपानी क्रूझवरच्या अमेरिकन नागरिकांची विमानाने घरवापसी

कोरोना, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, नेपाळ, आरोग्य
फोटो कॅप्शन, जपानी क्रुझवर अनेक नागरिक अडकले आहेत.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याची भीती असलेल्या जपानी बोटीवरील अमेरिकेच्या नागरिकांना घेऊन अमेरिकेची विमानं निघाली.

जपानी वृत्तसंस्था क्योडोने दिलेल्या बातमीनुसार, वेगळं ठेवण्यात आलेल्या क्रूझ डायमंड प्रिन्सेसमधून अमेरिकेच्या नागरिकांना घेऊन सोमवारी सकाळी अमेरिकेची दोन विमानं रवाना झाली.

या विमानांनी जपानची राजधानी टोकियाच्या हॅनेडा विमानतळावरून उड्डाण केलं आहे.

News image

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अमेरिकेचे 400 नागरिक 3 फेब्रुवारीपासून जपानच्या एका क्रुझवर अडकून पडले होते.

अमेरिकेच्या 40 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर जपानमध्येच उपचार करण्यात येतील.

कोरोना, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, नेपाळ, आरोग्य

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, अमेरिकेचं विमान

जपानच्या योकोहामा बंदरात डायमंड प्रिन्सेस नावाच्या बोटीवर 3,700 जणांना कोरोनाच्या भीतीमुळे वेगळं ठेवण्यात आलं आहे.

हाँगकाँगला उतरणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर बोटीच्या कर्मचाऱ्यांना काही व्यक्तींना वेगळं ठेवावंच लागलं.

चीनच्या बाहेर हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. डायमंड प्रिन्सेस बोटीवरील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 70हून 355 झाल्याचं जपानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अमेरिकेच्या काही नागरिकांनी क्रूझ सोडून जाण्यास नकार दिला. 19 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहू असं या नागरिकांचं म्हणणं आहे. जपानच्या प्रशासनाने 19 फेब्रुवारीपर्यंत या रुग्णांना वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असलेल्या लोकांबरोबर विमान किंवा बसप्रवास करू इच्छित नाही असं बोटीवरील अमेरिकन वकील मॅट स्मिथ यांनी म्हटलं आहे.

मदतीसाठी आयफोनचं वितरण

अमेरिकेव्यतिरिक्त इस्राइल, हाँगकाँग आणि कॅनडा या देशांची विमानं आपापल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी विमानं पाठवली आहेत. नेपाळचं एक विमान चीनच्या वुहान शहरातून 175 नागरिकांना घेऊन काठमांडूला पोहोचलं.

दरम्यान जपानी सरकारने डायमंड प्रिन्सेस बोटीवरील प्रवाशांना 2,000 आयफोन दिले आहेत. क्रूझवरच्या प्रत्येक केबिनसाठी एक आयफोन देण्यात आला आहे जेणेकरून जपानच्या आरोग्य मंत्रालयाने तयार केलेलं अॅप वापरून डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञांशी बोलू शकतील. मात्र जपानच्या बाहेर नोंदणीकृत फोनवरून अॅप अॅक्सेस करू शकत नाहीत.

चीनमधल्या 68,500 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. चीनच्या बाहेर जवळपास 30 देशांमध्ये 500 अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

फ्रान्स, हाँगकाँग, फिलीपाईन्स तसंच जपानमध्येही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची प्रकरणं आढळली आहेत.

बीबीसी

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)