Samsung Galaxy S20, Z Flip: मोटोरोलानंतर सॅमसंगने बाजारात आणला फ्लिप फोन

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्कर सोहळा पाहणाऱ्यांना सॅमसंगने एक रविवारी एक सुखद धक्का दिला होता. सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी Z फ्लिप फोनची जाहिरात पहिल्यांदा ऑस्कर सोहळ्या दरम्यान दाखवली.
त्यानंतर काल सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सॅमसंगने गॅलेक्सी Z फ्लिप फोन आणि गॅलेक्सी S20 फोन लाँच केले.
यापूर्वी मोटरोलाने मोटो रेझर हा त्यांचा जुना फीचर फोन फ्लिप फोन म्हणून लाँच केला होता. तर सॅमसंगनेच गॅलेक्सी फोल्ड हा फोन लाँच केला होता.
'बेंडेबल अल्ट्राथिन ग्लास डिस्प्ले' (Bendable Ultra-thin Glass Display) असणारा हा फोन तब्बल 2 लाख वेळा उघड-बंद केला जाऊ शकतो, असा दावा कंपनीने केलाय.
पूर्ण उघडल्यानंतर 6.7 इंचांचा डिस्प्ले असणाऱ्या या फोनला फोल्ड केल्यावर बाहेरच्या बाजूला 1.1 इंचांचा लहानसा OLED डिस्प्लेही आहे.
Snapdragon 855 Plus प्रोसेसर, 8GB रॅम , 256GB स्टोरेज, आणि 3,300mAh ड्युएल बॅटरी असे या फोनचे स्पेसिफिकेशन असतील.
अमेरिकन आणि दक्षिण कोरियन मार्केटमध्ये हा फोन 1,380 डॉलर्सला उपलब्ध असेल. पण जगभरातल्या इतर देशांत हा फोन लाँच कधी होणार हे जाहीर करण्यात आलेलं नाही.
यासोबतच सॅमसंगने गॅलेक्सी सीरिजमधला S20 फोनही लाँच केलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गॅलेक्सी S20, S20+ आणि S20 अल्ट्रा अशी तीन व्हर्जन्स सॅमसंगने लाँच केली. हे फोन्स 5G आहेत. 6 मार्चपासून हे फोन्स अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होतील.
या सगळ्या S20 फोन्सद्वारे 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल. शिवाय या फोनच्या कॅमेऱ्यासाठी स्पेस झूम हे नवीन फीचरही देण्यात आलं आहे.
या फीचरच्या मदतीने हाय-रिझोल्यूशन फोटोज झूम करून त्यातून नवीन फोटो क्रॉप करता येतील. शिवाय टिकटॉक प्रेमींसाठी सॅमसंगने या फोनमध्ये सिंगल टेक फीचर दिलंय. याद्वारे वेगळ्या लेन्सद्वारे युजर्सना 10 सेकंदाचे व्हिडिओज बनवता येतील.
कोरोना व्हायरसचा उत्पादनावर परिणाम
सॅमसंगच्या फोनमधले काही भाग चीनमध्ये तयार होतात. याचा काही प्रमाणात परिणाम सॅमसंगच्या फोन उत्पादनावर होईल.
पण सॅमसंगला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत मोठं नुकसान झालेलं नाही, कारण सॅमसंगचे बहुतेक हँडसेट्स हे व्हिएतनाममध्ये तयार होतात.
पण चीनही मोबाईल फोन्ससाठीची सर्वांत मोठी बाजारपेठ असल्याने मोबाईल फोन्सच्या मागणीवर मात्र या कोरोना व्हायरसचा परिणाम होईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









