SpaceX : स्पेसएक्सचं ड्रॅगन कॅप्सुल यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतले

नासा

फोटो स्रोत, NASA

अमेरिकेच्या नवीन अंतराळवीरांना अवकाशात नेण्यासाठीचं नवीन कॅप्सुल यशस्वरीत्या परत आलं आहे. प्रात्याक्षिकांसाठी प्रक्षेपित करण्यात आलेलं हे कॅप्सुल अटलांटिक महासागरात उतरलं आहे.

स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सुलने इंटरनॅशनस स्पेस स्टेशन सोडल्यानंतर ते आज पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात पोहोचलं. पृथ्वीच्या वातावरणात परत येताना उच्च तापमानाचा सामना करण्यासाठी या कॅप्सुलला हीटशिल्ड बसवण्यात आल्या आहेत.

चार पॅराशूटच्या साहायाने हे कॅप्सुल फ्लोरिडा जवळ अटलांटिक महासागरात अलगद उतरलं.

ही मोहीम मानवरहित होती. मानवाच्या जागी कॅप्सुलमध्ये सेन्सर बसवलेली डमी होती.

GO Searcher

फोटो स्रोत, NASA

नासासाठी अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी स्पेसएक्सने ही कॅप्सुल बनवली आहे. अंतराळवीर पाठवण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी ही चाचणी मोहीम आवश्यक होती.

स्पेस शटल हा कार्यक्रम संपल्यानंतर अमेरिकेने अंतराळात माणूस पाठवलेला नाही. यासाठी अमेरिकेला रशियाच्या सोयूज या स्पेसक्राफ्टवर अवलंबून राहावं लागत असे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

स्पेसएक्सचं ड्रॅगन आणि बोईंग बनवत असलेल्या कॅप्सुलमुळे ही पिछाडी भरून काढता येईल, असं अमेरिकेला वाटतं.

जुलैमध्ये या कॅप्सुलमधून महिला मानव अवकाशता जाऊ शकेल. पण आताच्या चाचणी मोहिमेतून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता ही तारीख थोडी पुढे जाऊ शकते.

हे कॅप्सुल जेव्हा महासागरात उतरलं तेव्हा इथं GO Searcher ही बोट कॅप्सुलला महासागरातून बाहेर काढण्यासाठी प्रतीक्षा करत होती. कॅप्सुल महासागरात उतरल्यानंतर नासाच्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.

Bob Behnken and Doug Hurley

फोटो स्रोत, NASA

स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी कॅप्सुल उतरण्यापूर्वी प्रतिक्रिया देताना अत्यंत अस्वस्थ वाटतं आहे, असं म्हटलं होतं.

तर स्पेसएक्सचे व्यवस्थापक बेंजामिन रीड नासा टीव्हीशी बोलताना म्हणाले, "हा प्रवास अत्यंत अतुल्य होता. नासा आणि स्पेस एक्सच्या टीमने उत्तम काम केलं आहे."

नासाने बोईंगला कॅप्सुल बनवण्यासाठी सुरुवातीचा निधी दिला असून स्टारलाईयनर या कॅप्सुलचं चाचणी प्रक्षेपण एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर नासा या दोन्ही कॅप्सुलच्या मदतीन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर पाठवेल. अर्थात या कंपन्या त्यांची सेवा इतर संस्थांना व्यावसायिकरीत्या देऊ शकतील. यामध्ये इतर देशांच्या अंतराळसंशोधन संस्था आणि खासगी व्यक्तींचाही समावेश असू शकेल.

ड्रॅगनमधून अंतराळात प्रवास करणारे पहिले अंतराळवीर बॉब बेहकेन आणि डॉऊग हर्ली असतील. त्यांचं सध्या स्पेसएक्समध्ये प्रशिक्षण सुरू आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)