समुद्रकिनाऱ्यावर येणारे हे अजब जीव जंतू आहेत की मासा?

पुरुषाच्या लिंगाप्रमाणे दिसणारे 'पेनिस फिश' हजारोंच्या संख्येने 2019 साली कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर आले होते.

सतत धडधडणाऱ्या या जीवांना fat innkeeper worms किंवा Urechis caupo असंही म्हणतात. मात्र त्यांचा आकार पाहता, ते एकप्रकारचे जंत असले तरी त्यांना 'पेनिस फिश' असं म्हटलं जातं.

पण कॅलिफोर्नियातल्या ड्रेक्स किनाऱ्यावर वादळामुळे हे जीव उघड्यावर आले असतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. हे ठिकाण सॅन फ्रॅन्सिस्कोपासून सुमारे 80 किमीवर आहे.

हे जंत स्वतःला वाळूत गाडून घेतात. त्यांचा आकार थोडा विचित्र असला तरी जमिनीखाली राहाण्यासाठी त्यांचा आकार अगदी सुयोग्य आहे, असं जैवशास्त्रज्ञ इवान पार सांगतात.

हे जंत 30 कोटी वर्षांपूर्वीही अस्तित्वात होते, असं त्यांच्या जीवाष्मावरून लक्षात येतं. त्यांचं आयुष्य 25 वर्षांचं असतं, असंही ते म्हणाले.

हे जंत U आकाराचे खड्डे खणून कित्येक फूट खाली जातात.

शार्कसकट अनेक माशांचं हे खाद्य आहे. माणूससुद्धा त्यांचा आपल्या अन्नात समावेश करू शकतो, असं सांगितलं जातं. त्याची एक प्रजाती पूर्व आशियातही सापडते. दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये त्याचं स्वादिष्ट पक्वान्न तयार केलं जातं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)