You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव पक्षातल्या लोकांमुळेच - एकनाथ खडसे
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे. त्यांनी बुधवारी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्यांची मतं मांडली आहेत.
पक्षातल्याच लोकांमुळे रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
"चर्चेअंती माझं आणि पंकजाचं एकमत आहे की काही प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परळी आणि मुक्ताईनगर जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला," असा आरोप खडसे यांनी केला आहे.
"बहुजन समाज आणि ओबीसींचं नेतृत्व करणारे नेते दुर्दैवानं हारले, काहींना तिकीटं नाकारली. निट रचना झाली असती तर 105 पेक्षा जास्त आमदार आले असते," असं सांगताना त्यांनी भाजपमधल्या ओबीसी नेत्यांची नावांची यादी सांगून त्यांच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलंय.
तुमचा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे का असा सावल केल्यावर, "माझा रोख माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा जो नेतृत्व करतो त्याच्यावरच असणार आहे," असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
शिवसेनेबरोबर चर्चा केली असती फार ताणूनव धरलं नसतं तर महायुतीचाच मुख्यमंत्री झाला असता असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)