मुंबईच्या तीनपट आकाराचा हिमनग झाला अंटार्क्टिकापासून वेगळा

फोटो स्रोत, RICHARD COLEMAN/UTAS
अंटार्क्टिकामध्ये गेल्या 50 वर्षातला सगळ्यात मोठा हिमनग तुटून वेगळा झाला आहे. 315 अब्ज टनांच्या या हिमनगाचा आकार 1,636 चौरस किलोमीटर एवढा आहे, म्हणजे मुंबईच्या तिप्पट किंवा पुण्याच्या पाचपट आकाराचा!
एवढ्या मोठ्या हिमनगाकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे, कारण भविष्यात तो जहाजांची येजा रोखू शकतो.
अमेरी हा अंटार्क्टिकामधला तिसरा सगळ्यात मोठा हिमनगाचा समूह किंवा एक बर्फाळ प्रदेश आहे. अंटार्क्टिकात बर्फ वितळून पाणी जाण्याच्या दृष्टीने हा प्रदेश महत्त्वाचा आहे.
यापूर्वी अमेरीतून 1960च्या दशकात 9,000 स्क्वेअर किमीचा महाकाय हिमनग वेगळा झाला होता.
हा हिमप्रदेश म्हणजेच जमिनीवरून समुद्राला मिळणाऱ्या अनेक हिमनद्यांचा समूह आहे. हिमनग वितळण्याच्या प्रक्रियेसह जैवसंस्थेचा समतोल साधला जातो.

फोटो स्रोत, NASA
शास्त्रज्ञांना कोणता हिमखंड वितळणार आहे, याची माहिती असते. पूर्व भागात हिमनगांची हालचाल वेगाने होत असल्याने तूर्तास सगळं लक्ष त्यादिशेने आहे.
या भागाचं नाव 'Loose tooth' असं पडलं आहे. एखाद्या लहान मुलाचा दात पडावा, असं या भागात हिमनग वितळल्यानंतरचं चित्र दिसतं आहे.
दोन्ही तुकडे विलग झाले असले तरी एकमेकांशी जोडलेले आहेत. D28 विखुरलं आहे.
Loose tooth हे 2010 ते 2015 या कालावधीत वितळेल असा अंदाज प्राध्यापक फ्रिकर यांनी व्यक्त केला होता.
हा हिमनग वितळणं आणि हवामान बदल यांचा संबंध नाही, असं संशोधकांचं म्हणणं आहे. हा हिमनग तुटल्याने घाबरून जाण्याचं कारण नाही असं संशोधकांनी म्हटलं आहे.
एवढ्या प्रचंड आकाराचा हिमनग तुटल्याने बाकी गोष्टींवर परिणाम होऊ शकतो, म्हणूनच द ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक डिव्हिजनच्या पुढील घडामोडींकडे बारीक लक्ष आहे.

फोटो स्रोत, COPERNICUS DATA/SENTINEL-1/@STEFLHERMITTE
D28चा 210 मीटर जाडीचा आहे आणि त्याने 315 अब्ज टन बर्फाळ क्षेत्रफळ व्यापलं होतं. D28 हे नाव US नॅशनल आईस सेंटरनं दिलं आहे.
D28 हे A68 नावाच्या महाकाय हिमनगापासून विलग झालं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








