नरेंद्र मोदी फादर ऑफ इंडिया - डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मोदी यांना 'फादर ऑफ इंडिया' म्हणजेच `भारताचे पिता' असं संबोधलं.
न्यूयॉर्कमध्ये दोन्ही नेत्यांची औपचारिक भेट झाली, यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की, "भारत (मोदीं) पूर्वी कसा होता, तिथे वाद होते, मारामारी होती, पण त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. एका पित्यासारखं त्यांनी काम केलं आहे, ते कदाचित देशाचे पिताच आहेत, आम्ही त्यांना भारताचे पिता म्हणणार."
राष्ट्राध्यक्ष ट्रंप म्हणाले की, त्यांना मोदींबद्दल खूप आदर आहे आणि ते माझं लाडकं व्यक्तिमत्त्व आहेत.

फोटो स्रोत, EPA
ट्रंप म्हणाले की, कट्टरवादाच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत संदेश दिलेला आहे आणि ते हे प्रकरण हाताळण्यास सक्षम आहेत, असं मला वाटतं.
ट्रंप असंही म्हणाले की, या दोन सज्जन व्यक्ती (मोदी आणि इम्रान) एकमेकांची भेट घेतील आणि काही ना काही उपाय जरूर काढतील. "यातून चांगलंच काहीतरी निष्पन्न होईल."
ट्रंप ह्यूस्टनमधल्या कार्यक्रमाबद्दलही बोलत होते. ते म्हणाले की, कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक मोदींना पाहून फारच आनंदित झाले होते.
"हा भला माणूस मला फार आवडतो. त्यांच्यासाठी लोक वेडी झाली होती. आमच्या अमेरिकेच्या रॉकस्टार एल्विस प्रेस्लीसारखेच आहेत नरेंद्र मोदी. एल्विस परत आलाय की काय असंच वाटत होतं."
पाकिस्तानाशी संबंधित प्रश्नांना बगल
पाकिस्तानच्या कट्टरवादाविषयासंदर्भातील प्रश्नांना मात्रं ट्रंप वारंवार बगल देत होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आयएसआयनेच अल कायदाला प्रशिक्षित केलं होतं अशी कबुली दिली आहे, यावर तुमचं मत काय आहे? असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांना विचारला. मी हे वक्तव्य ऐकलेलं नाही, अशी प्रतिक्रिया यावर त्यांनी दिली. ट्रंप पुढे म्हणाले की, "तुमचे प्रप्रधान ते पाहून घेतील याची मला खात्री आहे."

फोटो स्रोत, Reuters
दोन्ही नेते (मोदी आणि इम्रान) काश्मीरच्या मुद्द्यावर उपाय करतील, असं झालं तर फारच चांगलं होईल असंही डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं, ते म्हणाले की, "आम्हाला सगळ्यांनाच हे होताना पाहायचं आहे."
इम्रान खान यांचीही भेट घेतलेली असून, या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं.
मोदी यांची भेट घेण्यापूर्वी एक दिवसआधी ट्रंप यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती. ह्यूस्टनमधल्या हाउडी कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी अतिशय आक्रमक विधान केल्याचं त्यावेळी ते म्हणाले होते.
"ज्यांना आपला देश सांभाळता येत नाही, जे कट्टरवाद पोसतात अशांना भारताच्या (काश्मीरवरच्या) निर्णयांबद्दल आक्षेप आहे," असं वक्तव्य हाउडी कार्यक्रमात मोदी यांनी पाकिस्तानचं नाव घेता केलं होतं.
व्यापारात लवकरच तडजोड होणार
भारताबरोबर व्यापारासाठी लवकरच तडजोड केली जाईल, त्यावर बोलणी सुरू आहेत, असं डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP GETTY
ते म्हणाले की, "मोठा निर्णय काही काळानंतर होईल, पण सध्या दोन्ही देशांमध्ये त्वरीत एक ट्रेड डील करण्यात येईल."
नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम डाउडी कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांचे आभार मानले.
ह्यूस्टनमध्ये 2.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.
ते म्हणाले की, "या निर्णयामुळे येत्या काही दशकांमध्ये 60 अब्ज डॉलर्सचा व्यापार होईल आणि तब्बल 50 हजार लोकांसाठी रोजगार उपलब्ध होईल. भारताने स्वतः याबाबतीत पुढाकार घेतला आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भारत आणि अमेरिका दोन्ही देश वेगाने पुढे जात आहेत, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
मोदी आणि ट्रंप यांच्या भेटीनंतर, भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की, "भारत पाकिस्तानबरोबर बोलणं टाळत नाही आहे. आम्ही पाकिस्तानबरोबर जरूर संवाद साधू, परंतु त्याआधी त्यांनी दहशतवादाविरोधात ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि पाकिस्तान अद्याप त्यादिशेनं काहीही हालचाल करत नाही आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








