वर्ल्ड कप 2019: विजय शंकर वर्ल्ड कपबाहेर; मयांक अगरवालला संधी

फोटो स्रोत, Getty Images
अष्टपैलू खेळाडू विजय शंकरच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित वर्ल्ड कपमध्ये तो खेळू शकणार नाही असं स्पष्ट झालं आहे. विजयऐवजी फलंदाज मयांक अगरवालला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. बीसीसीआयने यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी सरावावेळी जसप्रीत बुमराहचा यॉर्कर विजयच्या पायाला लागला होता. मात्र ही दुखापत गंभीर नाही असं संघव्यवस्थापनाने स्पष्ट केलं होतं.
अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत विजय खेळला होता. मात्र या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही.
चौथ्या स्थानी विजयऐवजी ऋषभ पंतला खेळवण्यात यावं अशी चर्चा जोर धरू लागली होती. इंग्लंडच्या मॅचपूर्वी विराट कोहलीने विजय शंकर लवकरच भारतासाठी मोठी खेळी करेल असं वक्तव्य केलं होतं.
24 तासानंतर टॉसच्या वेळी विराटने विजय पायाला झालेल्या दुखापतीमुळे खेळणार नसल्याचं सांगितलं. विजयऐवजी ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला. ऋषभने 32 धावांची खेळी केली. मात्र टीम इंडियाला या मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं.
या मॅचदरम्यान विजयने राखीव खेळाडू म्हणून ड्रिंक्स आणण्याचं काम केलं.
आणखी 24 तासांनंतर विजय उर्वरित वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही असं जाहीर करण्यात आलं. पायाची दुखापत बरी होण्यास तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने विजय उर्वरित वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही असं स्पष्ट झालं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
विजयऐवजी मयांक अगरवालला संधी देण्यात आली आहे. मयांक अद्याप वनडे पदार्पण केलेलं नाही. त्याने भारतासाठी दोन टेस्ट खेळल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये वर्षानुवर्ष धावांची टांकसाळ उघडणारा खेळाडू म्हणून मयांकची ओळख आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मयांक रोहितच्या साथीने सलामीला येण्याची शक्यता आहे.
दरम्यान वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हा पंधरा खेळाडूंव्यतिरिक्त चार राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामध्ये अंबाती रायुडू, अक्षर पटेल, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांचा समावेश होता.
शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर ऋषभचा संघात समावेश करण्यात आला. विजय दुखापतग्रस्त झाल्यानंतर अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणे यांची नावं चर्चेत होती. मात्र निवडसमितीने मयांकच्या नावाला पसंती दिली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








