'हो, मी ऑटोसेक्शुअल आहे आणि मी स्वतःलाच डेट करते'

ऑटोसेक्शुअल

फोटो स्रोत, BBC THREE

मी स्वतःकडेच आकर्षित होते हे ऐकून थोडंसं विचित्र नक्कीच वाटेल.

इतर टीनएजर्सप्रमाणे मलाही माझं व्यक्तिमत्व आणि माझ्या दिसण्याची काळजी वाटतेच. अंघोळ केल्यावर, कपडे घालताना किंवा लैंगिक आकर्षणाचा विचार करते तेव्हा मी स्वतःच्याच रुपाला आरशात पाहाते.

कदाचित माझं शरीर आकर्षक नसेल. मी बारीक आहे, थोडी उंच आहे, माझे केस कुरळे आहेत. परंतु कपड्यांविना माझं शरीर खरंच मला आकर्षित करतं.

आधी माझ्या या अशा लैंगिकतेचा विचार केल्यावर मला विचित्र वाटायचं. परंतु वयाच्या 17 व्या वर्षी माझ्या मित्र-मैत्रिणींना माझ्याबद्दल सांगितलं तेव्हा माझे विचार बदलले.

आम्ही एकत्रच मोठे झालो. अजूनसुद्धा आम्ही एकमेकांच्या जवळ आहोत. आम्ही नेहमीच लैंगिकतेवर चर्चा करत असू.

पण जेव्हा मी माझ्या या लैंगिक अनुभवाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांना ते कळलंच नाही. त्यांना हे हास्यास्पद वाटलं. या गोष्टीवरून ते माझी चेष्टा करू लागले.

मी पण त्यांच्या विनोदांवर हसत असे. पण माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे, असा विचार करून मनातल्या मनात विचार करत असे. सामान्य लोकांपेक्षा मी वेगळी आहे. मी स्वतःकडेच आकर्षित होते हे मला समजलं. पण आता त्याची मला सवय झाली आहे.

हे असं स्वतःकडे आकर्षित होण्याला ऑटोसेक्शुअल अशी शास्त्रीय संज्ञा असल्याचं मला नुकतंच समजलं आहे. आता मी स्वतःला मोठ्या गर्वानं ऑटोसेक्शुअल म्हणवते.

ऑटोसेक्शुअलिटी म्हणजे काय?

जे लोक स्वतःच्या शरीराला पाहूनच स्वतःला लैंगिक सुख देऊ शकतात आणि स्वतःच्या शरीराकडे आकर्षित होतात त्याला ऑटोसेक्शुअल अशी शास्त्रीय संज्ञा आहे.

ऑटोसेक्शुअल

फोटो स्रोत, BBC THREE

हे लोक गे किंवा लेस्बियन नसतात, तर याला ऑटोसेक्शुअल म्हटलं जातं. या लोकांना कोणत्याही लिंगाच्या इतर व्यक्तीप्रती लैंगिक आकर्षण नसतं.

ऑटोसेक्शुअल या संज्ञेसाठी शब्द तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना भरपूर मेहनत करावी लागली. हा शब्द परिभाषेत आणण्यासाठी पुरेशी माहिती किंवा संशोधन उपलब्ध नव्हतं.

परंतु 1989 मध्ये लैंगिकविषयांचे तज्ज्ञ बर्नार्ड अपलबाऊम यांनी या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख केला. जे लोक इतर कोणत्याही व्यक्तींकडे आकर्षित होत नाहीत त्यांच्यासाठी हा शब्द बर्नार्ड यांनी वापरला होता.

मात्र आता जे लोक स्वतःच्या शरीराकडेच आकर्षित होतात त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो.

स्वतःबरोबर डेटिंग आणि स्वतःबरोबरच रोमान्स

मायकल आरोन यांनी'मॉडर्न सेक्शुअलिटीः द ट्रुथ अबाऊट अँड रिलेशनशिप' हे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणतात, स्वतःच्या शरीराकडे पाहून आकर्षित होणं सामान्य बाब आहे. परंतु काही लोक इतरांच्या तुलनेत स्वतःला पाहून, स्वतःला स्पर्श करून अधिक उत्तेजित होतात. अशा लोकांना ऑटोसेक्शुअल म्हटलं जातं.

अनेक लोकांनी मला नार्सिस्ट म्हटलं. जी व्यक्ती स्वतःवर भरपूर प्रेम करते आणि स्वतःवरच मुग्ध होऊन जाते तिला नार्सिस्ट म्हटलं जातं.

नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसॉर्डर या आजाराचं रूग्णांमध्ये सहानुभूती कमी मिळणं, कौतुकाची गरज वाटणं अशा भावनांची लक्षणं दिसतात, असं लंडन विद्यापीठात शिकवणारे डॉ. जेनिफर मॅकगोवन सांगतात. परंतु ऑटोसेक्शुअल यांच्यापेक्षा वेगळे असतात असं ते म्हणतात.

ऑटोसेक्शुअल

फोटो स्रोत, BBC THREE

ऑटोसेक्शुल लोक एकटेच लैंगिक सुख मिळवतात. पण नार्सिस्ट लोकांना दुसऱ्या लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटत असतं. मात्र ऑटोसेक्शुअल लोकांना इतरांच्या प्रशंसेशी काही देणं-घेणं नसतं. असं डॉ. जेनिफर सांगतात.

काही तज्ज्ञ सांगतात, इतर लोकांप्रमाणे ऑटोसेक्शुअल लोकांमध्येही लैंगिकतेचे वेगवेगळे स्तर दिसून येतात. काही लोक ऑटोसेक्शुअलिटीबरोबर ऑटोरोमॅंटिकही असतात. ते स्वतःलाच डेट करतात किंवा चांगल्या मौसमात एकटेच फिरायलाही जातात.

ऑटोसेक्शुअलटीबरोबर मला कधीकधी आपण सामान्य व्यक्तींप्रमाणे असावं असं वाटत. मला काय वाटतं हे माझे मित्र समजू शकत नाहीत, त्यामुळे मला राग येतो.

बॉयफ्रेंडबरोबर मी असते तेव्हा मला थोडं वेगळं वाटत असतं. पण लैंगिकदृष्ट्या माझा बॉयफ्रेंड समजू शकतो ते मला समजत नाही.

त्यामुळे आपणही सामान्य लोकांप्रमाणे असावं मला वाटतं. पण माझी लैंगिकता वेगळी आहे हे लक्षात घेऊन आपण सर्वजण वेगवेगळे आहोत असा विचार मी करते.

ऑटोसेक्शुल

फोटो स्रोत, BBC THREE

नुकतीच एका ऑटोसेक्शुअल महिलेशी माझी ऑनलाइन भेट झाली आहे. तिला मी ऑटोसेक्शुअल असल्याचं सांगितलं आहे.

तिच्याशी बोलून मला बरं वाटलं. लैंगिकतेच्या आराखड्यात आपण कोठे उभं आहोत हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

बहुतांश लोकांना हे समजणार नाही.

आमच्याबद्दल मत बनवणं, बोलणं सोपं आहे पण ऑटोसेक्शुअल व्यक्तीला कसं वाटतं हे तुम्हाला कधीच समजणार नाही.

मी अनेक जणांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते पण स्वतःबरोबर जे वाटतं ते इतर कोणाबरोबरही वाटलं नाही.

(ही कहाणी सांगणाऱ्या मुलीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. ही बातमी बीबीसी थ्रीच्या राधिका संघानी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेवर आधारित आहे.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)