ब्रेक्झिट : युरोपियन युनियनमधून UKने बाहेर पडण्याची तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात संमती

फोटो स्रोत, Reuters
अखेर ब्रेक्झिट टळलं, पूर्णपणे नाही तरी तात्पुरतं.
ब्रिटन आता युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा मुहूर्त 31 ऑक्टोबरचा ठरला आहे. आधी ही तारीख 29 मार्च होती, पण युनायटेड किंग्डमच्या संसदेत वाटाघाटींवर सर्वसंमती न होऊ शकल्याने ही वेळ पुढे ढकलण्यात आली होती.
ब्रसेल्समध्ये बुधवारी तब्बल पाच तास युरोपियन राष्ट्रांची बैठक चालली. त्यानंतर युनायटेड किंग्डम आणि EU यांच्यात ब्रेक्झिट पुढे ढकलण्यावरून संमती झाली आहे, असं युरोपियन महासंघाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी जाहीर केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मी माझ्या ब्रिटिश मित्रांना विनंती करतो की निदान आतातरी वेळ दवडू नका, असं ते यावेळी म्हणाले.
युरोपिन महासंघाची 5 तास चर्चा चालल्यानंतर थेरेसा मे या बैठकीत सामील झाल्या. तेव्हा त्यांनी आधी 30 जूनरोजी बाहेर पडण्यासंदर्भातला प्रस्ताव EU नेत्यांपुढे मांडला.
या बैठकीपूर्वी बोलताना त्यांनी, जर ब्रिटन संसदेत त्यांचा वाटाघाटींचा प्रस्ताव मंजूर झाला तर ही तारीख आणखी पुढे ढकलता येईल, असा पर्यायही खुला ठेवला होता.
पण आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वऱ्हाडकर यांचा आग्रह होता की UKने मे महिन्यात निवडणुका घ्याव्यात नाहीतर 1 जून रोजी युरोपशी कुठल्याही कराराविना युरोपमधून बाहेर पडावं.

फोटो स्रोत, Reuters
या बैठकीनंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना युरोपियन महासंघाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क म्हणाले, "आता सगळंकाही UKच्या हातात आहे. त्यांनी एकतर बाहेर पडण्याचा प्रस्ताव संमत करावा, ज्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्याची वेळच येणार नाही."
टस्क बोलले की UKपुढे अजूनही दुसरा पर्याय आहे, तो म्हणजे कलम 50 रद्दबातल ठरवावं आणि युरोपमधून बाहेर पडण्याबद्दलचा विचारच बंद करावा.
बीबीसीच्या कॅट्या अडलर यांच्यानुसार ब्रेक्झिटसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मिळालेली मुदतवाढ हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा विजय आहे. UK आणि EUमधल्या वाटाघाटींदरम्यान यासाठी सर्वांत जास्त प्रयत्न करत होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








