ब्रेक्झिट करार तिसऱ्यांदा फेटाळला : थेरेसा मे यांच्या राजीनाम्याची मागणी

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनच्या खासदारांनी थेरेसा मे यांनी सादर केलेला ब्रेक्झिट करार फेटाळला आहे. ज्या दिवशी ब्रिटनने युरोपीयन युनियनमधून बाहेर पडणं नियोजित केलं होतं, त्याच दिवशी हा करार फेटाळला होता. ब्रिटनने युरोपीयन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी युरोपीयन युनियनसोबत करार करण्याची आवश्यकता आहे. हा करार म्हणजेच ब्रेक्झिट डील होय.
सरकारचा 344 विरुद्ध 286 मतांना पराभव झाला आहे. याचाच अर्थ असा की ब्रेक्झिटला 22 मेपर्यंत मुदतवाढ घेणं आणि करारासह युरोपीयन युनियनमधून बाहेर पडणं, ब्रिटनने गमावलं आहे.
त्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे म्हणाल्या, "यूकेला आता पर्याय शोधावा लागेल." युरोपीयन युनियनच्या निवडणुकीतही यूकेला भाग घ्यावा लागेल, असं दिसतं.
थेरेसा मे यांच्याकडे तडजोडींवर चर्चा करण्यासाठी दीर्घ मुदतवाढ मिळावी यासाठी 12 एप्रिलपर्यंत वेळ आहे, जेणे करून त्या दिवशी नो डील ब्रेक्झिट टाळू शकतील.
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये नो डील ब्रेक्झिटच्या बाजूने बहुमत आहे. त्यामुळे मे यांनी पर्याय मार्ग शोधावे लागतील, असं म्हटलं आहे.
युरोपीयन काऊन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी 10 एप्रिलला युरोपीयन काऊन्सिलची बैठक बोलावली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
European Research Group of Brexiteer Conservativesचे उपाध्यक्ष स्टीव्ह बेकर यांनी थेरेसा मे यांनी राजीनामा द्यावा, असं म्हटलं आहे. "हा करार मंजूर झालेला नाही, तो होणारही नाही. थेरेसा मे यांनी त्यांचा शब्द पाळावा. नव्या नेतृत्वाने जागा घेणं आणि ब्रेक्झिट करार सादर करणं आवश्यक आहे."
हे मतदान पंतप्रधानांच्या युरोपीयन युनियनच्या करारावरील सर्वंकष मतदान नव्हतं. या करारात युरोपीयन युनियनसोबत भविष्यातील राजकीय संबधांच्या उद्घोषणेचा समावेश आहे. सरकारने फक्त Withdrawl Dealवर मतदान घेतलं. सरकारची अशी अपेक्षा होती की ब्रेक्झिटला मुदतवाढ घेण्यासाठी थोडावेळ मिळेल आणि यूके युरोपीयन युनियनच्या निवडणुकीत भाग घेणार नाही.
यासंदर्भात तडजोडींसाठी पुढील आठवड्यात सोमवारी आणि बुधवारी पुन्हा मतदान होईल. यातील एका पर्यायाल जरी बहुमत मिळालं तर सरकार त्याचा उपयोग राजकीय उद्घोषणेतील बदलांच्या तडजोडींसाठी करू शकेल.
मजूर पक्षाचे नेते जेर्मी कॉर्बिन म्हणाले, "सदनाचा कल स्पष्ट आहे, हा करार आता बदलावा लागेल. पर्याय शोधावा लागेल, त्यासाठी जर पंतप्रधान तयार नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा."
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








