ब्रेक्झिट : पुन्हा मतदान घेण्यासाठी ब्रिटनचे नागरिक रस्त्यावर

ब्रेक्झिट

फोटो स्रोत, Getty Images

ब्रेक्झिटवर पुन्हा एकदा मतदान घ्यावं, या मागणीसाठी मध्य लंडनमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात जवळपास 10 लाख लोकांनी भाग घेतला.

Put It To The People असं या मोहिमेला नाव देण्यात आलं आहे. या मोर्चात 10 लाख लोकांनी भाग घेतला, असं संयोजकांनी सांगितलं. ब्रिटनच्या संसदेवर हा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात सहभागी लोकांनी युरोपियन युनियनचा ध्वज आणि फलक हाती घेतले होते.

गुरुवारी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. तर पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रेक्झिटचा करार तिसऱ्यांदा मतदानासाठी सादर केला जाण्याची शक्यता नाही, असं वक्तव्य केल्याने त्यांच्यावरही राजीनामा देण्याचा दबाव आहे.

या मोर्चात सहभागी झालेल्यांमध्ये मजूर पक्षाचे उपाध्यक्ष टॉम वॉटसन, स्कॉटलंडचे मंत्री निकोला स्टरजिऑन, लंडनचे महापौर सादिक खान, अपक्ष आमदार अॅना सौबरी, माजी महाधिवक्ते डॉमिनिक ग्रिव्ह इत्यादी नेते सहभागी झाले होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

लंडनमध्ये 2003ला Stop The War हा मोर्चा निघाला होता, त्यापेक्षा हा मोर्चा मोठा होतं, असं सांगण्यात आलं. बीबीसीचे प्रतिनिधी रिचर्ड लिस्टर म्हणाले, "संयोजकांनी 10 लाख लोक मोर्चात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. अशा आकडेवारीची खातरजमा करता येत नाही. पण मोर्चात प्रचंड गर्दी होती, यात काही शंका नाही."

उपस्थितांना संबोधित करताना टॉम वॉटसन म्हणाले, "ब्रेक्झिटवर थेरेसा मे यांनी सादर केलेला करार अत्यंत खराब आहे. जर लोकांना या करारावर मतदान करण्याची संधी मिळणार असेल तरच मी या करारावर मतदान करणार. तुम्ही देशाला गोंधळाच्या परिस्थिती ढकलत आहात. लोकांच्या हाती नियंत्रण द्या, असं मी म्हणेण."

'गेम ऑफ थ्रोन्स'मधील लेना हेडी, स्ट्रिक्टली कम डान्सिंगची सादरकर्ती कॉडिया विंकलमेन, पेट शॉप बॉयजचे नील टेनान्टही या मोर्चात सहभागी झाले होतं.

सादिक खान मोर्चात सुरुवातीपासून सहभागी झाले होते.

हुजूर पक्षाचे नेते जॉन रेडवूड म्हणाले, "1 कोटी 60 लोकांना युरोपियन युनियनमध्ये राहायचं आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यात अजून काही लोक वाढू शकतील. त्यातील काहींना पुन्हा मतदान घ्यावं असं वाटू शकतो, पण ही संख्या नेहमीच कमी असेल."

ब्रेक्झिट

फोटो स्रोत, Reuters

ब्रिटनने 12 एप्रिलपूर्वी जर खासदारांनी कराराला मंजुरी दिली नाही तर कराराशिवाय ब्रिटनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं लागणार आहे.

तर दुसरीकडं कलम 50 रद्द करून ब्रेक्झिट रद्द करावं, या मागणीसाठी ब्रिटिश संसदेच्या वेबसाईटवर दाखल झालेल्या ऑनलाईन याचिकेवर 40 लाख लोकांनी स्वाक्षरी केली आहे. ही पिटिशन सुरू करणाऱ्या मार्गारेट जिरोजिडाऊ यांनी त्यांना 3 वेळा खुनाच्या धमक्या आल्याचा दावा केला आहे.

खासदार लायला मोरन यांनी ब्रेक्झिटवर पुन्हा मतदान घ्यावं या मागणीला या मोर्चाने बळ दिलं असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)