पृथ्वीच्या वातावरणात उल्केचा महाविस्फोट

फायरबॉलचं रेखाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फायरबॉलचं रेखाचित्र
    • Author, पॉल रिंकॉन
    • Role, विज्ञान संपादक, बीबीसी न्यूज

डिसेंबर महिन्यात पृथ्वीच्या वातावरणात उल्कास्फोट झाल्याचं नासानं म्हटलं आहे. या स्फोटातून निर्माण झालेली ऊर्जा हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबाँबपेक्षा 10 पट जास्त होती. रशियातील बेरिंग समुद्रावर हा स्फोट झाल्यानं तो फारसा कुणाच्या लक्षात आला नाही, असं नासानं म्हटलं आहे.

याला फायरबॉल म्हटलं जातं. अशी घटना शतकातून दोन किंवा तीन वेळा घडते, अशी माहिती नासातील प्लॅनेटरी डिफेन्स अधिकारी लिंडली जॉन्सन यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

सहा वर्षांपूर्वी रशियातील चिलॅबिंक्स इथं घडलेल्या घटनेपेक्षा हा स्फोट मोठा होता.

आतापर्यंत आपल्याला काय माहिती आहे?

18 डिसेंबरला स्थानिक वेळेनुसार ही घटना घडली. जवळपास 32 किलोमीटर प्रतितास वेगाने ही उल्का पृथ्वीच्या वातावरणात आली. 7 अंशाच्या कोनात ही उल्का पृथ्वीच्या वातावरणात आली. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 25.6 किलोमीटर इतक्या उंचीवर या उल्केचा स्फोट झाला. ही इम्पॅक्ट एनर्जी 173 किलोटन इतकी मोजली गेली आहे. या उल्केची लांबी काही मीटर होती.

'चिलॅबिंक्स इथं झालेल्या घटनेशी तुलना करता 40 टक्के जास्त ऊर्जा यातून बाहेर पडली. पण ही घटना समुद्रावर घडल्याने ती फार प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकली नाही," असं नासाच्या अधिकारी केली फास्ट यांनी म्हटलं आहे. त्या नासाच्या निअर-अर्थ ऑब्जेक्टस ऑब्जर्व्हेशन कार्यक्रमाच्या व्यवस्थापक आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. हे एक प्रकारे सुरक्षा पुरवतं," असं त्या म्हणाल्या. फास्ट टेक्सासमधील 50th Lunar and Planetary Science Conferenceमध्ये बोलत होत्या.

लष्करी उपग्रहांनी या स्फोटाची माहिती नोंदवली आणि ती नासाला दिली. ही घटना जिथं घडली त्या भागात उत्तर अमेरिका आणि आशिया असा प्रवास करणाऱ्या विमानांची संख्या जास्त आहे. यातील विमानांना ही घटना नोदंवता आली की याची माहिती घेतली जात आहे.

या घटनेचं महत्त्व काय आहे?

2005मध्ये अमेरिकेच्या संसदेने नासाला पृथ्वीच्या जवळपास फिरणाऱ्या अशा उल्कांचा शोध घेण्यास सांगितलं होतं. जर अशी एखादी उल्का पृथ्वीवर कोसळली तर त्या जागेचं मोठं नुकसान होऊ शकतं. पण संसदेने दिलेल्या या सूचना अंमलात येण्यासाठी पुढची 30 वर्षं लागतील, असं नासानं म्हटलं आहे.

पृथ्वीच्या वातावरणात असा अशनी आला तर त्याचा पृथ्वीवर किती प्रभाव पडू शकतो, याचा नासा अंदाज बांधू शकतं.

नासा

पण या घटनेतून एक लक्षात आलं आहे, ते म्हणजे अशा मोठ्या अशनी कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय पृथ्वीवर कोसळू शकतात. म्हणजेच अवकाशातील लक्ष ठेवण्याची व्यवस्था अधिक बळकट करावी लागणार आहे. यासाठी फक्त पृथ्वीवरील दुर्बिण उपयोगी पडणार नाहीत, त्यांना अवकाशातील वेधशाळाही लागतील.

यासाठी जी मोहीम आखली आहे, त्यात नीओ-कॅम ही टेलेस्कोप असणार आहे. ही दुर्बिण ग्रॅव्हिटेशनल बॅलन्स पॉंईंटवर असणार आहे. त्यामुळे पृथ्वीच्या जवळ असणारे, 140 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या 90 टक्के उल्का शोधता येतील. JPLच्या या प्रकल्पावर अॅमी मैन्झर काम करत आहेत. इन्फ्रारेडवर काम करणारी दुर्बिण असेल तर हे काम वेगवान होईल, असं त्या म्हणाल्या.

जपानच्या हिमावारी या उपग्रहाने हा अशनी टिपला आहे.

फोटो स्रोत, HIMAWARI/JMA/@SIMON_SAT

फोटो कॅप्शन, जपानच्या हिमावारी या उपग्रहाने हा अशनी टिपला आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)