जपानचे रोबो पोहोचले अशनीवर; ग्रहांची निर्मिती उलगडणार

अशनी

फोटो स्रोत, @haya2e_jaxa

फोटो कॅप्शन, जपानने पाठवलेले रोबोट अशनीवर उतरले आहेत.

जपानची अवकाश संशोधन संस्था JAXAनं नवा इतिहास रचला आहे. जपानने अवकाशात पाठवलेले 2 रोबोटिक यान एका अशनीवर यशस्वीरीत्या उतरले आहेत. या यानांनी या अशनीची छायाचित्रही पाठवली आहेत. स्पेसक्राफ्टमधून अशनीवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शुक्रवारी हायाबुसा-2 या स्पेसक्राफ्टमधून ही दोन 'रोव्हर' अशनीवर उतरली आहेत. हा अशनी 1 किलोमीटर इतका मोठा असून या दोन रोव्हर प्रकारच्या यानांनी या अशनीवर भटकंती सुरू केली आहे. हे दोन यान म्हणजे रोबोच आहेत.

अशनी

फोटो स्रोत, JAXA, UNI TOKYO & COLLABORATORS

फोटो कॅप्शन, हीच ती अशनी

JAXAनं दोन्ही रोव्हर उत्तमपणे काम करत असल्याचं म्हटलं आहे. हे रोव्हर अशनीच्या पृष्ठभागावरील छायाचित्र घेऊ शकतात, आणि तापामान नोंदवू शकतात.

Ryugu असं या अशनीचं नाव आहे. हायाबुसा-2ला या यानाजवळ पोहोचायला साडेतीन वर्षं लागली.

युरोपियन स्पेस एजन्सीनं यापूर्वी धूमकेतूवर यान उतरवलं होतं. पण अशनीवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अशनी काय आहेत?

सौरमालेची निर्मिती होत असताना जे काही उरलं ते म्हणजे अशनी आणि उल्का होय. Ryugu हा अगदी प्राथमिक अशनी आहे. या अशनीचा अभ्यास ग्रहांच्या निर्मितीवरही प्रकाश पडू शकतो. हा अशनी हिऱ्याच्या आकाराचा आहे. त्याचा रंग काळसर आहे. स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साडेसात तास लागतात.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

हायाबुसा कसं पोहोचलं अशनीपर्यंत?

गुरुवारी सकाळी हायाबुसा - 2 या अशनीजवळ पोहोचले. हायाबुसा-2च्या खालच्या भागात एका कंटेनरमध्ये हे दोन लहान यान होते. हे यान म्हणजे रोबो आहेत. यांची नावं Minerva II-1 असं आहे.

या रोव्हरनी अशनीच्या पृष्ठभागावरून पाठवलेलं छायाचित्र.

फोटो स्रोत, TWITTER/HAYABUSA2@JAXA

फोटो कॅप्शन, या रोव्हरनी अशनीच्या पृष्ठभागावरून पाठवलेलं छायाचित्र.

शुक्रवारी सकाळी या अशनीपासून 196 फूट उंचीवरून हे रोबोट / यान अशनीवर उतरले.

हे दोन रोव्हरवर वाईड अँगल, स्टेरिओ कॅमेरे आहेत. शिवाय तापमान मोजण्यासाठी सेन्सर आहेत.

पुढं काय होईल?

हायाबुसा-2 ऑक्टोबरमध्ये या अशनीवर उतरेल आणि तेथून दगड आणि मातीचे नमुने गोळा करेल. Ryuguच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवेल आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा केले जातील. हे यान नमुन्यांसह 2020ला पृथ्वीवर परत येणं अपेक्षित आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)