You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लठ्ठ उंदराला वाचवण्यासाठी राबवली बचाव मोहीम
माणसांना आपत्तीतून आणि संकटातून वाचवण्यासाठी आपत्ती निवारण कक्ष, अग्निशमनदल आदी व्यवस्था कार्यरत असतात. यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा प्राण्यांना वाचवल्याचेही आपण वाचतो. जर्मनीतील अशाच एका बचाव पथकाने चक्क एका उंदराला वाचवत आगळ्या माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.
झालं असं की जर्मनीतील बेंसहाईम या शहरात एका मॅनहोलच्या झाकणाला असलेल्या छिद्रातून एक मादी उंदीर बाहेर येण्यासाठी धडपडतं होती. ती गलेलठ्ठ असल्याने या छिद्रात ती अडकली होती. तिला ना तर बाहेर जाता येत होत ना आत.
एका लहान मुलीला मॅनहोलमध्ये अडकलेली ही उंदीर दिसली. तिने अग्निशमन दलाला याची माहिती कळवली.
एक उंदीर संकटात असल्याचा कॉल शहरातील अग्निशमन दलाला आल्यानंतर तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेला 'लहान प्राणी' असं सांकेतिक नाव देण्यात आलं.
या मोहिमेचं नेतृत्व मायकल सेहर यांच्याकडे होतं. सेहर यांना काहींनी विचारलं की उंदराला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न का केले असं त्यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, "ज्या प्राण्यांचा लोक तिरस्कार करतात, त्यांचाही आपण सन्मान केला पाहिजे."
सेहर आणि 9 जणांची टीम जागेवर पोहचली. पण या उंदराला सोडवणं काही शक्य होत नव्हतं. त्यांनी मॅनहोलचं झाकण काढून उभं केलं आणि मग तिला सोडवलं. त्यानंतर तिला परत त्याच गटारात सोडून देण्यात आलं.
या पूर्ण मोहिमेची शहरात मोठी चर्चा झाली नसती तरच नवल.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)