You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युद्धात रोबोंच्या वापरावर बंदी घाला : शास्त्रज्ञांनी केलं आवाहन
आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नियंत्रित करता येणाऱ्या शस्त्रास्त्र निर्मितींवर बंदी घालावी, अशी मागणी काही संशोधकांनी केली आहे. अशा प्रकारच्या स्वयंचलित शस्त्रास्त्रांत काही बिघाड झाल तर अगणित निष्पाप लोक मारले जातील, असं संशोधकांना वाटतं.
नैतिकतेच्या अनुषंगाने काम करणाऱ्या तज्ज्ञांची ही अशीच भूमिका आहे.
वॉशिंग्टनमध्ये झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्समध्ये हे विचार मांडण्यात आले.
50 देशांतील 89 NGOनी एकत्र येत यासाठी आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचं नाव Campaign to stop Killer Robots असं असेल. यासाठी आंतरराष्ट्रीय करार व्हावा, असं या संस्थांची भूमिका आहे.
या संस्थांमध्ये ह्युमन राईट्स वॉचचाही सहभाग आहे. या संस्थेच्या पदाधिकारी मॅरी वॅरहेम म्हणाल्या, "आम्ही चालत्या बोलत्या रोजच्या वापरातील रोबोटबद्दल बोलत नाही. आम्हाला जी काळजी आहे ती अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची."
"ड्रोनचं उदाहरण आहेच. पण स्वतःच उड्डाण भरतील, उडतील आणि लँड होतील, अशी लढाऊ विमानं बनतील, हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणा असेल. अशा प्रकारी स्वायत्त असणारी शस्त्रास्त्रांचा धोका मोठा आहे," असं ते म्हणाले.
क्लिअर पाथ रोबोटिक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी रयान गिरिपी यांनी या मागणीला पाठबळ दिलं आहे.
ही कंपनी शस्त्रास्त्र बनवते पण त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युद्धात वापर व्हायला त्यांचा विरोध आहे. आपली कंपनी अशी शस्त्रास्त्र बनवणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
अशी शस्त्रास्त्र जर बिघडली तर ती अंदाज करण्याच्या पलीकडे असतात, असं ते म्हणाले.
"आर्टिफिशिअल इंटेलिजन्स युद्ध मैदानावर काय करायचं याचा निर्णय घेऊ शकत नाही. कुणाला मारयचं आणि कुणाला मारायचं याचा निर्णय स्वयंचलित यंत्रणा निर्वात स्थितीमध्ये घेऊ शकत नाही. हा निर्णय हजारो मैल अंतरावर बसलेले आणि युद्धभूमीत काय सुरू आहे याचं ज्ञान नसलेले संशोधक आणि प्रोग्रॅमर घेतील," असं ते म्हणाले.
न्यूयॉर्क येथील न्यू स्कूलचे पिटर अॅस्रो म्हणाले, जरा अशा शस्त्रास्त्रांच्या प्रणालीने बेकायदेशीररीत्या काही हत्या केल्या तर त्यांची कायदेशीर जबाबदारी कोणाची असाही प्रश्न निर्माण होणार आहे.
यंत्र हे काही नैतिकतेचे धारक नाहीत. त्यामुळे जीवन आणि मरणाचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे यंत्रांणा कुणाला मारण्याचे अधिकार देता येणार नाहीत. त्यामुळे जे अशी यंत्रणा बनवतील, तेच याला जबाबदार असतील, असं ते म्हणाले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)