You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भूमध्य समुद्र ओलांडताना 2 बोटी बुडून 170 स्थलांतरितांना जलसमाधी
भूमध्य समुद्रात बोट बुडण्याच्या 2 घटनांत जवळपास 170 लोकांचा बुडून मृत्यू झाला असल्याची भीती युनायटेड नेशन्स हाय कमिशन फॉर रेफ्युजीने (UNHCR) व्यक्त केली आहे. शुक्रवारी या घटना घडल्या.
इटलीच्या नौदलाने लिबियाच्या किनाऱ्यावर बोट बुडाल्याची माहिती दिली आहे. या बोटीवर 117 लोक होते. तर दुसरी घटना पश्चिम भूमध्य सागरात घडली असल्याचे मोरोक्को आणि स्पेनच्या प्रशासनाने म्हटलं आहे. मृतांची नेमकी संख्या कळू शकलेली नाही.
2018मध्ये भूमध्य सागर ओलांडताना एकूण 2200 स्थलांतरितांना जीव गमावला आहे.
UNHCRचे आयुक्त फिलिपो ग्रँडी यांनी युरोपाच्या दाराशी होत असलेल्या या मृत्यूंकडे दुलर्क्ष करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या घटनेत भूमध्य समुद्राच्या पश्चिमेला 53 प्रवासी असलेलली बोट बुडाली. यातील बचावलेली एक व्यक्ती 24 तास समुद्रात अडकून पडली होती. या व्यक्तीवर मोरोक्कोत उपचार सुरू आहेत.
तर दुसरी बुडालेली बोट लिबियातून शनिवारी निघाली होती. या बोटीत 120 लोक होते अशी माहिती बचावलेल्या 3 लोकांनी दिली आहे. या 3 तिघांना हेलिकॉप्टरने समुद्रातून बाहेर काढण्यात आले.
International Organisation for Migrationने दिलेल्या माहितीनुसार 2019मध्ये पहिल्या 16 दिवसांत 4,216 स्थलांतरितांनी समुद्र ओलांडून युरोपमध्ये प्रवेश केला आहे.
इटलीसह काही युरोपीय देशांनी स्थलांतरितांना सामावून घेण्यास नकार दिला आहे. इटलीते उपपंतप्रधान मॅटो सालविनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, "जोपर्यंत आपण स्थलांतरितांना स्वीकारत राहू तोपर्यंत तस्कर अशी कामं करत राहतील आणि लोक प्राणाला मुकतील."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)