DNA शोधणाऱ्या नोबेल विजेत्या जेस्म वॅटसन यांनी का गमावली पदं आणि सन्मान?

फोटो स्रोत, EPA
वंश आणि बुद्धिमत्ता यांच्या संबंधावर टिप्पणी केल्यामुळे नोबेल विजेते शास्त्रज्ञ जेम्स वॅटसन यांची पदं आणि सन्मान काढून घेण्यात आले आहेत.
जेम्स वॅटसन DNA अभ्यासाचे आद्य अभ्यासक मानले जातात. 1953 साली डीएनएच्या दुहेरी हेलिक्स संरचनेचा शोध वॅटसन, मॉरिस विल्किन्स आणि फ्रान्सीस क्रीक यांनी लावला होता. त्याबद्दल 1962 साली त्यांना नोबेल मिळाले होते.
"बुद्ध्यांक चाचणीमध्ये कृष्णवर्णिय आणि श्वेतवर्णिय यांच्यामध्ये वंशामुळे पडणारा फरक दिसून येतो," असे वक्तव्य त्यांनी एका टीव्ही कार्यक्रमात केले होते.
वॅटसन यांची ही शेरेबाजी असंबद्ध आणि अयोग्य असल्याचे मत कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरीने म्हटले आहे. 2007 सालीही वॅटसन यांनी अशीच शेरेबाजी केली होती आणि माफीही मागितली होती.
आपण वंशासंदर्भात केलेल्या टिप्पणीनंतर वैज्ञानिकांच्या समुदायाच्या वागण्याने आपण अस्वस्थ झालो असं सांगत वॅटसन यांनी 2014मध्ये आपलं नोबेलचं सुवर्णपदक विकलं होतं. कार अपघातात जखमी झाल्यामुळे ते नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहेत. आजूबाजूच्या घटनांबद्दल त्यांना अत्यंत कमी माहिती आहे, असे सांगण्यात येते.
2007मध्ये टाइम्स वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला आफ्रिकेच्या भविष्याबाबत स्वाभाविकपणे दूःख होतं असं ते म्हणाले होते, "त्यांची बुद्धिमत्ता 'आपल्या'सारखीच असते अशा गृहीतकावर आपली सामाजिक धोरणं बेतलेलं आहे. मात्र चाचण्यांमधून ती सारखी नसल्याचं दिसून आलं आहे."
जे लोक कृष्णवर्णियांबरोबर काम करतात त्यांना हे गृहीतक खोटं असल्याचं दिसून येतं, असंही वॅटसन म्हणाले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या शेऱ्यानंतर डॉ. वॅटसन यांना चॅन्सलर पदावरून तसंच सर्व प्रशासकीय कार्यातून मुक्त करण्यात आले होते. त्यांनी माफी मागितल्यावर त्यांना चॅन्सलर एमिरटस, ऑलिव्हर आर ग्रेस प्रोफेसर एमिरटस आणि ऑनररी ट्रस्टी ही मानद पदं परत मिळाली होती.
अमेरिकेतील वृत्तवाहिनी पीएसबीवर दाखवलेल्या 'डिकोडिंग वॅटसन' या माहितीपटामध्ये आपली मतं कायम असल्याचं वॅटसन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांची सर्व मानद पदं काढून घेत आहोत असं कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरीनं जाहीर केलं आहे.
वॅटसन यांचं वक्तव्य निंदनीय आणि अशास्त्रीय असल्याचं लॅबोरेटरीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
डॉ. वॅटसन 1968 साली कोल्ड स्प्रिंग हार्बरचे संचालक झाले. त्यानंतर 1994 साली संस्थेचे अध्यक्ष व 2004मध्ये चॅन्सेलर झाले. त्यांच्या नावाने लॅबोरेटरीमध्ये अध्यासनाचीही स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती असोसिएटेड प्रेसनं दिली आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. वॅटसन याचे पुत्र रुफस म्हणाले, "वॅटसन यांच्या विधानामुळे ते कट्टर किंवा भेदभाव करणारे ठरू शकतात. पण ते अयोग्य आहे."
"अनुवंशशास्त्राच्या भवितव्याबद्दलचं ते एक संकुचित विवेचन आहे असं म्हणता येईल. माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य लॅबोरेटरीसाठी वाहून घेतलं आणि आता त्यांचीच लॅबला अडचण वाटत आहे," अशा शब्दांमध्ये रुफस यांनी आपलं मत व्यक्त केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








