You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेशच्या संसदेतील हिंदू खासदार कोण आहेत?
- Author, बीबीसी मॉनिटरिंग
- Role, नवी दिल्ली
बांगलादेशातील नवनिर्वाचित सदस्यांनी गुरुवारी देशाच्या 11व्या संसदेसाठी शपथ घेतली.
30 डिसेंबर 2018ला बांगलादेशात मतदान पार पडलं होतं. यामध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीगला बहुमत मिळालं होतं.
बांगलादेश संसदेतील सदस्य संख्या 300 इतकी आहे. यापैकी 288 जागांवर अवामी लीगनं विजय मिळवला आहे. तसं बांगलादेश संसदेची सदस्य संख्या 350 आहे. यातील 50 जागा या महिला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या जागांसाठी निवडणुकीची आवश्यकता नाही.
अवामी लीगनं देशातल्या अल्पसंख्याक समाजातील 18 जणांना उमेदवारी दिली होती. यांतील बहुतेक उमेदवार हिंदू आहेत.
या सर्वांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. गतवेळच्या संसदेप्रमाणे 11 व्या संसदेतही अल्पसंख्याक समाजाचे 18 उमेदवार आहेत.
स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, यांतील काही नेते हे प्रतिष्ठित आहेत.
बीरेन सिकदर
बीरेन सिकदर मागील सरकारमध्ये क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री होते.
बांगलादेशातल्या राजशाही यूनिव्हर्सिटीमधून एमएची पदवी प्राप्त करणारे सिकदर पेशानं वकील आहेत.
यापूर्वी ते संसदेच्या अनेक समित्यांचे सदस्यही राहिले आहेत.
याशिवाय टेक्सटाईल आणि जूट मिनिस्ट्रीच्या संसदीय स्थायी समितीचे ते अध्यक्ष होते.
रमेश चंद्र सेन
रमेश चंद्र सेन 10व्या संसदेत जल संसाधन आणि अन्न मंत्री होते.
ते अवामी लीगच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य आहेत. यावरून अवामी लीग पक्षातील त्यांचं महत्त्व लक्षात येतं.
जोया सेनगुप्ता
जोया सेनगुप्ता या बांगलादेशच्या संसदेतील अल्पसंख्याक समुदायातील एकमेव महिला खासदार आहेत. अवामी लीगचे नेते सुरनजीत सेनगुप्ता हे त्यांचे वडील.
पतीच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सुनामगंज या मतदारसंघातून त्या 2017मध्ये सर्वप्रथम निवडून आल्या होत्या.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या एका बिगर शासकीय संस्थेत काम करत होत्या.
नारायण चंद्र चंद और बीर बहादुर उश्वे सिंह
नारायण चंद्र चंद हे गेल्या सरकारमध्ये मत्स्यपालन मंत्री होते. ते चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
बीर बहादुर उश्वे सिंह यापूर्वी चटगाव हिल मंत्री होते. ते सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. संसदेच्या निवास प्रकरणांशी संबंधित समितीचे ते सदस्यही होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)