कोसळलेल्या इमारतीखाली उणे 17 अंश तापमानात ते बाळ जिवंत

रशियात सोमवारी गॅसचा स्फोट होऊन एक इमारत कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका बाळाला जिवंत वाचवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे तिथं सध्या उणे 17 डिग्री तापमान आहे. या बाळाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी मास्कोला हलवण्यात आलं आहे.

रशियातल्या माग्निटोर्गोस्क शहरात हा अपघात झाला होता. इमारतीच्या ढिगाऱ्याखालील व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या ढिगाऱ्याखालून 11 महिन्यांच्या बाळाला जिंवत बाहेर काढण्यात आलं. स्थनिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार त्या ढिगाऱ्याखालून रडण्याचा आवाज येत होता, त्यानंतर वेगाने पावलं उचलत बाळाला बाहेर काढण्यात आलं.

या बाळाचं नाव इवान आहे.

इवानला गंभीररीत्या Frostbite झाल्याने त्याच्या डोक्याल्या दुखापत झाली आहे. तसेच त्याचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

इवानची आई सुखरूप असून हॉस्पिटलमध्ये ते दोघे एकत्र आहेत, असं रशियाच्या बचावकार्य विभागाने सांगितलं

उणे तापमान आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. रात्री तर तापमान आणखी खाली जात असल्यानं बचावकार्य ठप्प होत आहे, अशी माहिती देण्यात आली.

आतापर्यंत 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजून 36 लोक बेपत्ता आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या इमारतीत एकूण 120 लोक राहत होते.

माग्निटोर्गोस्क हे शहर राजधानी मॉस्कोपासून 1695 किमी दूर आहे. घटनेची पोलीस चौकशी सुरू झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)