मिस वर्ल्ड 2018 : वेनेसा लिऑन बद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

2017ची मिस वर्ल्ड मानुशी छिल्लरनं यंदाची मिस वर्ल्ड वेनेसा पोंसे डि लिऑनला मिस वर्ल्डचा मुकूट घातला.

नुकतच चीनच्या सान्या शहरात मिस वर्ल्ड स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

अंतिम फेरीमध्ये व्हेनेसाला विचारण्यात आलं की, मिस वर्ल्ड बनल्यानंतर ती कशापद्धतीनं दुसऱ्यांची मदत करू शकेल?

त्यावर "मी माझ्या पदाचा गेल्या 3 वर्षांपासून जसा वापर करत आले आहे तसाच वापर करेन. आपण सगळ्यांची काळजी घ्यायला हवी, सर्वांवर प्रेम करायला हवं. कुणाची मदत करणं काही खूप अवघड काम नाही. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कुणीतरी असं दिसेल ज्याला मदतीची गरज आहे. तेव्हा आपण नेहमी मदतीकरता तत्पर राहायला हवं," असं उत्तर वेनेसानं दिलं.

26 वर्षांची वेनेसा मेक्सिकोसाठी मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली महिला ठरली आहे.

वेनेसाचं जन्म मेक्सिकोच्या मुआनजुआटो शहरात झाला आहे.

वेनेसाची उंची 174 सेंटीमीटर आहे. तिनं यंदाच मिस मेक्सिको स्पर्धा जिंकली होती.

वेनेसाला इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा येतात. फावल्या वेळात तिला आउटडोअर गेम खेळायला आवडतात.

मुलींच्या पुनवर्सनासाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या संचालक मंडळातही वेनेसाचा समावेश आहे.

मिस वर्ल्ड 2018च्या अंतिम पाच स्पर्धक : मिस थायलंड निकोलीन पिचापा लिमनकन, मिस यूगांडा क्विन अब्नेक्यो, मिस मेक्सिको वेनेसा पोंसे डि लियोन, मिस जमैका कदिजा रोबिनसन आणि मिस बेलारूस मारिया वसिलविच. (डावीकडून उजवीकडे)

भारताकडून यंदा अनुक्रिती वासनं मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभाग घेतला होता. टॉप-30 पर्यंत पोहोचण्यात तिला यश आलं, पण त्यानंतर तिला पुढे मजल मारता आली नाही.

गेल्या वर्षी 17 वर्षांनंतर मानुषी छिल्लरनं भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून दिला होता.

बेलारूसची प्रतिस्पर्धी मारिया वसिलविच.

वेनेसानं इंटरनॅशनल बिझनेस विषयात पदवी संपादन केली आहे. याशिवाय तिनं मानवाधिकारात पदव्युत्तर पदवीही पूर्ण केली आहे.

वेनेसा ही नेनेमी नावाच्या एका शाळेत अध्यापनचं कामंही करते. या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्कृतींची शिकवण दिली जाते.

वेनेसाला व्हॉलीबॉल खेळायला आवडतं. तसंच तिनं स्कूबा डायव्हिंगमध्येही प्रमाणपत्र मिळवलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)