डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट करून महाधिवक्त्यांना पदावरून हटवलं

ट्रंप, सेशन्स

फोटो स्रोत, Reuters

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी महाधिवक्ता जेफ सेशन्स यांना पदावरून हटवलं आहे. ट्रंप यांनी स्वत:च टि्वटदवारेही घोषणा केली.

सेशन्स यांच्या जागेवर तुर्तास चीफ ऑफ स्टाफ असलेले मॅथ्यू जी व्हीटाकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असंही ट्रंप यांनी जाहीर केलं आहे.

"जेफ सेशन्स यांनी महाधिवक्ता म्हणून बजावलेल्या कामगिरीबद्दल धन्यवाद. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा,"असं ट्रंप यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

राजीनाम्यात सेशन्स यांनी, "आपल्या विनंतीनुसार मी हा राजीनामा देत आहे," असं म्हटल आहे. त्यामुळे ते स्वत:हून राजीनामा देत नसल्याचं एकप्रकारे स्पष्ट झालं आहे. या पत्रावर तारीख नाही.

"कार्यकाळात कायद्याचे राज्य प्रस्थापित करता आलं, त्याबद्दल राष्ट्राध्यक्षांचे आभार," असंही त्यांनी म्हटलं आहे.

मध्यावधी निवडणुकींच्या निकालानंतर ट्रंप यांनी पत्रकार परिषदे घेतली होती. तत्पूर्वी ट्रंप यांचे चीफ ऑफ स्टाफ जॉन केली यांनी सेशन्स यांच्याशी चर्चा केली होती.

कायदा विभागाची जबाबदारी असलेल्या या ज्येष्ठ सहकाऱ्यावर ट्रंप यांची गेल्या काही काळापासून खप्पामर्जी झाली होती.

त्याची सुरुवात झाली ती मार्च-2017मध्ये. त्यावेळी सेशन्स यांनी अमेरिकी निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेप प्रकरणाच्या चौकशीपासून बाजूला झाले होते.

जेफ सेशन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेफ सेशन्स

ट्रंप यांच्या निवडणूक प्रचाराच्या काळात रशियाच्या राजदूताशी झालेल्या बैठकीची माहिती त्यांनी सेनेटसमोर दिलेली नसल्याचं डेमोक्रॅटिक पक्षानं लक्षात आणून दिल्यावर सेशन्स यांनी या चौकशीपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला होता.

सेशन्स हे अलाबामा येथून सेनेटवर निवडून आले होते. ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीचं समर्थन करणारे ते पहिलेच सेनेटर होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)