तुर्कस्तानचा आरोप : सौदी अरेबियाच्या दूतावासात पत्रकाराची हत्या

पत्रकार जमाल खाशोज्जी

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, पत्रकार जमाल खाशोज्जी

तुर्कस्तानचा सत्ताधारी पक्ष एके पार्टीच्या एका मोठ्या नेत्यानं दावा केला आहे की, सौदी अरेबियाचे गायब असलेले पत्रकार जमाल खाशोज्जी यांची हत्या करण्यात आली आहे.

इस्तांबूलमधल्या सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात ही हत्या झाल्याचा दावा तुर्कस्तानच्या पोलिसांनी केला आहे.

ही हत्या विचारपूर्वक करण्यात आल्याची माहिती शनिवारी तुर्कस्थानच्या दोन अधिकाऱ्यांनी दिली होती. तसंच खाशोज्जी यांचा मृतदेह दूतावासातून हटव्यात आल्याचंही ते म्हणाले.

जमाल खाशोज्जी हे मंगळवारी आपल्या तलाकची कागदपत्र घ्यायला दूतावासात गेले होते. तेव्हापासून ते गायब आहेत.

तुर्कस्तानच्या पोलिसांनी सौदी अरेबियाच्या दूतावासात त्यांची हत्या झाल्याचा दावा जरी केला असला तरी अद्याप त्यासदर्भातले पुरावे ते सादर करू शकलेले नाहीत.

दुसरीकडे सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

शनिवारी इस्तांबूलमध्ये सौदी अरेबियाचे राजदूत मोहम्मद अल ओतैबी यांनी माहिती दिली की, "सौदीचे नागरिक जमाल हे सौदी अरेबियाच्या दूतावासात किंवा सौदी अरेबियात नाही, याची खात्री मी देतो. तसंच आमच्या दूतावासातर्फे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात असून आम्हाला त्यांच्याविषयी चिंता आहे."

खाशोज्जी यांची मैत्रीण हदीजे जेनगीज यांच म्हणनं आहे की, त्या अनेक तास दूतावासाच्या बाहेर त्यांची प्रतिक्षा करत होत्या, पण ते दूतावासाच्या बाहेर आलेच नाहीत.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, खाशोज्जी यांची मैत्रीण हदीजे जेनगीज यांच म्हणनं आहे की, त्या अनेक तास दूतावासाच्या बाहेर त्यांची प्रतिक्षा करत होत्या, पण ते दूतावासाच्या बाहेर आलेच नाहीत.

खाशोज्जी हे सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार आहेत आणि अलिकडच्या काळात ते अमेरिकेत वास्तव्याला असून द वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहतात.

ते सौदी अरेबियाच्या राजघराण्याचे विशेषतः क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांचे कडवे टीकाकार आहेत.

राजघराण्याचे टीकाकार

वॉशिंग्टन पोस्टचे राजकीय संपादक अली लोपेज यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, खाशोज्जी यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं.

ते म्हणाले, "ते तिथं असणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी चिंतित होते आणि त्यांना सत्य मांडण्यासाठी आपला देश सोडावा लागेल. त्यांना या गोष्टीची कल्पनाही होती की, त्यांचे विचार सौदी अरेबियाच्या सर्वांत शक्तिशाली लोकांना आव्हान देणारे आहेत. मला वाटतं की ते नेहमी विचारपूर्वक धोका पत्करत होते."

त्याचवेळी पत्रकारांच्या सुरेक्षेसाठी काम करणाऱ्या एका समितीशी निगडीत असलेले रॉबर्ट माहनी यांच म्हणणं आहे की, राजघराण्यावर टीका करणारे पत्रकार सुरक्षित नाही.

जमाल खाशोज्जी यांच्या प्रकरणावरून तुर्कस्तान आणि सौदी अरेबियाच्या संबधांत तणाव निर्माण होऊ शकतो.

जर तुर्कस्ताननं लावलेले आरोप खरे ठरले तर दोन्ही देशांमधले संबध नजिकच्या दशकांमध्ये सर्वाधिक तणावपूर्व स्थितीत असतिल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)