लैंगिक छळाच्या आरोपांवरून अमेरिकेत न्यायाधीशाची चौकशी

ब्रेट कॅव्हेनॉ आणि ख्रिश्चिन फोर्ड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रेट कॅव्हेनॉ आणि ख्रिश्चिन फोर्ड

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील रिक्त असलेल्या न्यायमूर्ती पदासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सुचवलेल्या उमेदवाराने लैंगिक छळ केल्याचे आरोप होत आहेत. या पदासाठी ब्रेट कॅव्हेनॉ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ब्रेट यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे.

तर सिनेटनं कॅव्हेनॉ यांच्या बाजूनं मतदान करावं, असे आदेश ट्रंप यांनी दिले आहेत. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. 9 सदस्य असलेल्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला तिथल्या राजकीय आणि समाजिक जीवनात मोठं महत्त्व आहे. तर अमेरिकेन बार असोसिएशनने या नियुक्तीसाठीचं मतदान पुढं ढकलून FBIकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ब्रेट यांनी Senate Judiciary Committeeला या प्रकरणास साक्ष दिली असून हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

"डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य माझ्या कुटुंबाला उध्वस्थ करत आहेत. माझं नाव राजकीय हेतूसाठी वापरण्यात येत आहे," असा आरोप त्यांनी केला आहे.

"ब्रेट यांनी 36 वर्षांपूर्वी माझ्यासोबत केलेल्या लैंगिक छळामुळे माझ्यावर मोठा परिणाम झाला," असा आरोप ख्रिश्चिन फोर्ड या महिलेने केला आहे. या महिलेचीही या समिती समोर साक्ष झाली.

"त्या घटनेनंतर अनेक वर्षं भीतीत जगत होते आणि मला लाजिरवाणं वाटत होतं. 1982ला घडलेल्या या घटनेवेळी माझं वय 15 तर ब्रेट यांचं वय 17 होतं. एका पार्टीत ही घटना घडली," असं त्यांनी सांगितलं. माझ्याशी गैरवर्तन करताना ब्रेट आणि त्यांचा मित्र एकमेकांकडे पाहून हसत होते. माझ्याशी गैरवर्तन करणारे ब्रेट होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

ज्यूली स्वेटनिक

फोटो स्रोत, MICHAEL AVENATT

फोटो कॅप्शन, ज्यूली स्वेटनिक

इतर ही काही महिलांनी ब्रेट यांच्यावर आरोप केले आहेत. 1980मध्ये एका पार्टीदरम्यान ब्रेट यांनी माझ्यासमोर स्वत:चे कपडे उतरवले होते, असं डेबोरा रामिरेझ यांनी म्हटलं आहे. 1980मध्ये एका पार्टीदरम्यान ब्रेट यांनी काही मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं, असा आरोप वॉशिंग्टन डीसी इथल्या रहिवासी ज्यूली स्वेटनिक यांनी केला आहे. कोलॅरेडो इथल्या सिनेटरला एका महिलेनं निनावी पत्र पाठवून ब्रेट एका महिलेसोबत बळजबरी करत असताना माझ्या मुलीनं पाहिलं होतं, असा आरोप केला आहे.

ब्रेट यांनी काय म्हटलं?

Senate Judiciary Committee सुरू असलेली प्रक्रिया म्हणजे राष्ट्रासाठी कलंक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. या समितीसमोर त्यांची साक्ष सुरू आहे.

"जुलै महिन्यात उमेदवारी जाहीर झाल्यापासून सतत काहीतर अडचणी येत आहेत. काहींना माझी उमेदवारी खटकत आहे. या प्रक्रियेतून मी माघार घ्यावी, असं काहींना वाटतं. पण मी घाबरणार नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.

कमिटी

फोटो स्रोत, POOL

डॉ. फोर्ड ज्या पार्टीविषयी बोलत आहेत, तिथं मी नव्हतो, असं ते म्हणाले.

ट्रंप यांची भूमिका काय?

"ब्रेट यांनी दिलेली साक्ष अधिक प्रामाणिक आणि प्रभावी आहे असं माझ्या लक्षात आलं आहे," असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

या घटना राजकीय स्वरूपाच्या असून डेमोक्रॅटिक पक्ष ब्रेट यांची उमेदवारी रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

तर ट्रंप यांनी या न्यायाधीशाच्या चारित्र्याचं सातत्याने समर्थन केलं आहे. मी आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वांत चारित्र्यवान तेच आहेत, असं त्यांनी ट्रंप यांनी म्हटलं आहे.

ब्रेट यांच्या विरोधातील आरोप सिद्ध झाले तर त्यांचं नामनिर्देशन मागे घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढं काय होणार?

सिनेटसमोर जाण्यापूर्वी ब्रेट यांना सिनेटच्या न्यायिक समितीने त्यांची निवड करावी लागेल.

प्रातिनिधिक फोटो

ही समितीत शुक्रवारी मतदान होणं अपेक्षित आहे. पण मतदानात विलंब होऊ शकतो, असं समितीचे सभापती रिपब्लिकन पक्षाचे नेते चक ग्रासली यांनी म्हटलं आहे.

तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या 10 सिनेट सदस्यांनी ब्रेट यांचं नामनिर्देशन मागं घ्यावं असं म्हटलं आहे.

रिपब्लिकन पक्षाला त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीची निवड नोव्हेंबरपूर्वी व्हावी असं वाटतं कारण अमेरिकेत होणाऱ्या मिडटर्म निवडणुकीत सिनेटमधील त्यांच्या जागा कमी होऊ शकतात. याचा परिणाम महिलांच्या मतांवरही होणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)