मलेरियाच्या डासांना प्रयोगशाळेत संपवण्यात संशोधकाना यश

फोटो स्रोत, SPL
संशोधकांना प्रयोगशाळेमध्ये डासांचा नायनाट करता येणं शक्य झालं आहे. जीन एडिटिंगचं तंत्रज्ञान वापरून संशोकांना हे शक्य झालं आहे. इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये हे संशोधन झालं.
मलेरियाचा प्रसार करणाऱ्या Anopheles gambiae या डासांवर हे संशोधन झालं आहे. संशोधकांनी या डासांतील डबलसेक्स नावाच्या जनुकामध्ये बदल केले. या जीनमुळे डासाचं लिंग ठरतं. या संशोधनामुळे डासांतील पुनरुत्पादन पूर्णपणे थांबवणे संशोधकांना शक्य झालं. त्यामुळे संशोधकांना असं वाटतं की या संशोधनामुळे भविष्यात डासांवर नियंत्रण मिळवता येईल.
हा रिसर्च पेपर Nature Biotechnologyमध्ये प्रसिद्ध झाला आहे. प्रा. अँड्री क्रिसांती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केलं आहे. या संशोधनासाठी हे डास पिंजऱ्यात ठेवले होते. या तंत्रामुळे 11 पिढ्यांत पिंजऱ्यातील सर्व डास संपून गेले.
क्रिसांती म्हणाले, "गेल्या 2 दशकांत 2016मध्ये पहिल्यांदाच असं घडलं की मलेरियाचं प्रमाण कमी झालं नाही. म्हणजेच डासांच्या नियंत्रणासाठी आपल्याला अधिक साधनं लागतील."
संशोधकांनी यामध्ये Crispr नावाचं तंत्र वापरलं. ज्या जीनमुळं मादी डासाची निर्मिती होते, त्या जीनमध्ये बदल करण्यात आले. मादी डासांतील या जीनमध्ये बदल केल्यामुळे हे डास चावूही शकत नव्हते किंवा अंडीही घालू शकत नव्हते.
प्रतिकार क्षमता
जनुकामध्ये बदल केल्यामुळे मादी डासांत वंध्यत्व निर्माण झालं. हा बदल केलेला जनुक जसजसा या पिंजऱ्यांतील डासांत परसला तसे हे डास संपले.
पण यापूर्वीही असे प्रयोग झाले होते. यात डासांनी अशा जनुकीय बदलांना प्रतिकार क्षमता विकसित केली होती. ज्या जनुकांत बदल करण्यात आले त्यात म्युटेशन होऊन असं घडत होतं.

फोटो स्रोत, SPL
पण डबलसेक्स जनुकात फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे डासांनी यात प्रतिकार क्षमता विकसित करता आली नाही.
संशोधकांना आता हा प्रयोग जास्त डासांवर करून पाहायचा आहे. अन्नाची उपलब्धता, पर्यावरणातील स्थिती याचा हा प्रयोग करताना काय परिणाम होतात, याचा अभ्यास करावा लागणार आहे.
क्रिस्तानी म्हणतात निसर्गातील डासांवर हा प्रयोग करण्यासाठी अजून 5 ते 10 वर्ष इतका कालवधी लागू शकतो.
ते म्हणतात, "मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी जनुकीय तंत्रावर अधारित उपायच उपयुक्त ठरणार आहेत."
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








