अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांचं बेघरांसाठी आणि शिक्षणासाठी 144 अब्ज रुपयांचं दान
जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती अशी ख्याती असलेले अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी शाळांसाठी आणि बेघरांसाठी जवळजवळ दोन अब्ज डॉलर (म्हणजे अंदाजे 144 अब्ज रुपये) रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निधीला 'Day One Fund' असं म्हटलं जाणार, असं बेझोस यांनी एक ट्वीट करून जाहीर केलं.
जेफ बेझोस यांची वैयक्तिक संपत्ती 164 अब्ज डॉलर्स आहे, पण ते सामाजिक कार्य करत नसल्याची ओरड होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अमेरिकन सिनेटर बर्नी सॅंडर्स यांनी अॅमेझॉनच्या गोदामात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती तसंच कंपनीवर टीकाही केली होती.
अॅमेझॉनच्या शेअर मूल्यात वाढ झाल्यानंतर तसेच टॅक्सवर सूट मिळाल्यानंतर बेझोस यांच्या वैयक्तिक संपत्ती बरीच वाढली. ती संपत्ती सामाजिक कार्यासाठी कशी खर्च करावी, याबाबत सुचवावे अशी विनंती बेझोस यांनी केली होती.
सध्या अमेरिकेत बेघरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यावर अनेक स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. बेझोस यांचा Day One Fund या संस्थांना देण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलं.
तसंच, अल्प उत्पन्न असलेल्या समुदायांसाठी असलेल्या शाळा तयार करण्यासाठी हा निधी वापरण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं.
Day One Family Fund आणि Day One Academy's Fund मध्ये हा निधी विभागून देण्यात येईल.

फोटो स्रोत, Reuters
बेघरांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना बक्षीस देऊन हा निधी त्यांच्यापर्यंत Day One Family Fund तर्फे पोहोचवण्यात येईल. ज्या संस्था किंवा व्यक्ती बेघरांना निवारा आणि अन्नाची सोय करतात त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
अल्प उत्पन्न गटातील समुदायांसाठी उत्तम गुणवत्ता असलेल्या शाळांचं नेटवर्क उभारून त्याचं व्यवस्थापन डे वन अॅकेडमीज फंडतर्फे केलं जाईल.
याआधी, 1 लाख कोटी डॉलरच्या वर मूल्य जाणारी अॅमेझॉन ही दुसरी कंपनी ठरली. त्याआधी अॅपलचं मूल्य 1 लाख कोटी डॉलरच्या वर गेलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
दोन अब्ज डॉलर ही रक्कम फार मोठी वाटत असली तरी बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि वॉरेन बफे जेवढी रक्कम सामाजिक कार्यावर खर्च करतात त्या तुलनेत हे काहीच नसल्याचं म्हटलं जात आहे.
गुंतवणूक तज्ज्ञ वॉरन बफे आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी Giving Pledge म्हणजेच संपत्ती दान करण्याचा संकल्प, अशी संकल्पना काढली. आपली वैयक्तिक संपत्ती समाजकार्यासाठी द्या, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं.
झुकरबर्ग यांनी आपल्या वैयक्तिक संपत्तीतील 99 टक्के संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्याचा संकल्प केला आहे.
बेझोस हे अॅमेझॉन व्यतिरिक्त 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राचे मालक आहेत. त्यांनी याआधी प्रिन्सटन विद्यापीठाला, कॅन्सर संशोधनाला आणि निर्वासितांच्या मुलांसाठी निधी दिला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









