ब्रिटीश संसदेबाहेरील कार अपघात हा 'दहशतवादी' हल्ला?

लंडनमध्ये संसदेच्या बाहेर कारचा अपघात हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता गृहीत धरून चौकशी केली जात आहे. वेस्टमिनिस्टरच्या बाहेर झालेल्या हा अपघातामध्ये 2 जण जखमी झाले आहेत.
या प्रकरणात 20 वर्षांच्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारनं सायकल चालकांना धडक दिली. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या जीवाला धोका नाही, अशी माहिती लंडन अँब्युलन्स सर्व्हिसनं दिली आहे.
या कारमध्ये दुसरे कुणीही नव्हतं. तसंच कारमध्ये कोणतीही शस्रास्त्र मिळाली नाहीत.
कार चालक दक्षिण लंडन पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस घटनास्थळी असलेल्या कारची तपासणी करत आहेत.
हा अपघात आम्ही दहशतवादी हल्ल्याचा प्रकार म्हणून पाहात आहोत. पोलीस दलातील दहशतवाद विरोध पथक या हल्ल्याचा तपास करत आहेत, अशी माहिती स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी दिली आहे.
घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या मते चंदेरी रंगाच्या या कारनं जाणीवपूर्वक लोकांना धडक दिली असं दिसतं.
बीबीसी न्यूजच्या गृह विभागाच्या प्रतिनिधी जून केली म्हणाल्या, "या घटनेतील 'दहशतवाद्या'ची अटक ही महत्त्वाची घटना आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "पोलीस संशयिताची ओळख, त्याची पार्श्वभूमी आणि इतर माहिती घेत आहेत. या व्यक्तीची श्रद्धा, त्याचं नातेवाईक आणि मानसिक स्थिती याचाही तपास सुरू आहे."

या घटनेनंतर वेस्टमिनिस्टर येथील मेट्रो रेल्वेचं स्टेशन बंद करण्यात आलं आहे. सध्या संसदेचं कामकाज सुरू नाही.
घटना पाहाणाऱ्या व्यक्तीनं सांगितले की ही कार पश्चिमेकडे जात होती, पण मध्येच कारनं पूर्वेकडील वाहतुकीच्या दिशेनं वळणं घेतलं.
पंतप्रधान थेरेसा मे, गृहमंत्री साजीद जाविद, लंडनेचे महापौर सादिक खान यांनी घटनेतल्या जखमींबद्दल सद्भावना व्यक्त करतानाच इथल्या इमर्जन्सी युनिटनं केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
बीबीसीचे कर्मचारी असलेले बॅरी विल्यम्स म्हणाले, "मोठा गोंधळ आणि गोंगाट सुरू झाला होता. ही कार चुकीच्या दिशेनं धावत होती. सायकल चालक सिग्नलवर जिथं थांबले होते त्या दिशेनं कार धावली आणि सायकल चालकांना उडवलं. त्यानंतर कारनं रीव्हर्स घेत तिथल्या बॅरिकेडला वेगानं धडक दिली." ही कार लहान होती, पण हा प्रकार लक्षात येताच लगेच पोलिसांनी या कारच्या दिशेनं धाव घेतली, असं ते म्हणाले.
जॅसन विल्यम्स यांनी बीबीसी रेडिओ-4ला माहिती दिली की, "या कारमधून धूर येत होता. लोक जमिनीवर पडल्याचं मला दिसलं. या लोकांना कारनं धडक दिली की नाही याची कल्पना नाही, पण मी किमान 10 लोक रस्त्यावर पडल्याचं पाहिलं. हे अपघातासारखं वाटत नव्हतं. जाणीवपूर्वक केलेला हा प्रकार वाटतो."
घटनास्थळी 10 पोलीस कार आणि 3 अँब्युलन्स होत्या. शिवाय श्वान पथकही तपास करत आहे.

घटनास्थळी असलेला बसचालक व्हिक्टर ओगबोमो यांनी या कारमधून धूर येत असल्याचं सांगितलं.
एव्हलिना ओचाब यांनी ही घटना पाहिली आहे. त्या म्हणाल्या, "हा प्रकार जाणीवपूर्वक घडवला असावा, असं मला वाटतं. लोक किंचाळत होते आणि ही कार रेलिंगच्या दिशेनं वेगानं येत होती. या कारची नंबर प्लेट दिसून आली नाही."
लंडन अँब्युलन्स सर्व्हिसच्या प्रवक्त्यानं सांगितले, "घटनास्थळी आम्ही 2 लोकांना प्रथोमपचार दिले. यांच्या जीवाला धोका आहे, असं वाटतं नाही. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे."
मार्च 2017ला वेस्टमिनिस्टर पुलावर खालिद मसुद यानं केलेल्या हल्ल्यात 4 लोक ठार झाले होते. त्यानंतर संसद भवनच्या भोवताली लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








