ब्रेक्झिटसाठीची डेडलाईन डिसेंबर 2020

ब्रेक्झिट

फोटो स्रोत, Getty Images

युनायटेड किंगडमला युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची मुदत 31 डिसेंबर 2020पर्यंत असल्याचं युरोपीय महासंघानं सांगितलं आहे. मार्च 2019 मध्ये महासंघातून बाहेर पडल्यानंतरच्या तात्पुरत्या सुविधा पुढील दोन वर्षांपर्यंत असाव्यात असं यूकेचं म्हणणं होतं.

पण यूकेला नियम आणि अटींचं पालन करावंच लागेल, असं महासंघानं म्हटलं आहे.

ब्रेक्झिटच्या स्थित्यंतराच्या काळाला यूकेनं अंमलबजावणीचा काळ असं संबोधलं आहे. तो किती असावा याबाबत दोन्ही बाजूंची चर्चा होणं बाकी आहे. पण 2020 नंतर ट्रान्झिशन फेज म्हणजे स्थित्यंतराचा काळ संपेल, असं आज ब्रसेल्सनं जाहीर केलं.

त्याचवेळी यूके ला सर्व अटींचं पालन करावं लागेल आणि आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हे चालणार नाही अशा शब्दात युरोपीय महासंघानं ठणकावलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)