नोबेल विजेते V. S. नायपॉल यांचं निधन : त्यांच्याविषयी जाणून घ्या 5 मुद्द्यांत

साहित्यातले नोबेल पुरस्कार विजेते आणि सुप्रसिद्ध लेखक V.S. नायपॉल यांचं लंडनमध्ये निधन झालं.

नायपॉल यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या 85 व्यावर्षी लंडनमधल्या त्यांच्या घरीच अखेरचा श्वास घेतला. लेखक म्हणून जगात नावारूपाला येण्याआधी त्यांनी बीबीसीमध्येही काम केलं होतं.

त्यांच्या पत्नीने नायपॉल यांच्या निधनानंतर सांगितलं की, "त्यांनी रचनात्मकता आणि आनंदी जीवन जगलं. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण त्यांच्यासोबत होता."

लेखक नायपॉल यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या 5 मुद्द्यांत -

1. भारतीय वंशाचे नायपॉल यांचा जन्म 1932मध्ये त्रिनिदादमध्ये झाला होता. त्रिनिदादमध्ये लहानाचे मोठे झाल्यानंतर नायपॉ़ल यांनी ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीतून शिक्षण घेतलं होतं.

2. 1950मध्ये त्यांनी एक सरकारी स्कॉलरशिप जिंकली होती. ज्यामुळे त्यांना कॉमनवेल्थ युनिर्व्हसिटीमध्ये प्रवेश मिळणार होता. पण त्यांनी ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीमध्ये प्रवेश घेतला.

3. 1951मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक 'The Mystic Masseur' प्रकाशित झालं. त्यानंतर A Bend in the River' आणि 'A House of Mr Biswas' ही त्यांची पुस्तकं विशेष गाजली. 'A House of Mr Biswas' हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना तीन वर्षांहून अधिक काळ गेला.

4. विद्यार्थी दशेत असताना डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.

5.नायपॉल यांना 1971मध्ये बुकर पुरस्कार आणि 2001मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)