इंग्लंडची 1000वी टेस्ट मॅच : हजारी मनसबदारीची ही 17 वैशिष्ट्यं

फोटो स्रोत, Getty Images
जगाला क्रिकेटची देणगी देणारा इंग्लंडचा क्रिकेट संघ नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. भारताविरुद्धची कसोटी ही इंग्लंडची विक्रमी हजारावी कसोटी आहे.
जाणून घेऊया इंग्लंडच्या हजारी मनसबदारीची ही 17 गुणवैशिष्ट्यं.
1. इंग्लंडनं पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1877 साली मेलबर्न इथे खेळला होता. या सामन्यात इंग्लंडला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
2. हजारावी कसोटी खेळणारा इंग्लंड हा पहिलाच संघ आहे.
3. इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या 903/7 ही आहे. 1938 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना इंग्लंडने ही विक्रमी मजल मारली होती.
4. इंग्लंडची नीचांकी धावसंख्या 45 अशी आहे. 1887 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना इंग्लंडवर ही नामुष्की ओढवली होती.
5. इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावांचा विक्रम अॅलिस्टर कुकच्या (12,145) नावावर आहे. ग्रॅहम गूच (8900) दुसऱ्या स्थानी तर अलेक स्टुअर्ट (8463) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
6. इंग्लंडसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम लेन हटन (364) यांच्या नावावर आहे.
7. इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकं अॅलिस्टर कुकच्या (32) नावावर आहेत.
8. इंग्लंडसाठी सर्वोच्च भागीदारी पीटर मे आणि कॉलिन काऊड्रे (411) यांच्या नावावर आहे.
9. इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम जेम्स अँडरसनच्या (540) नावावर आहे. स्टुअर्ट ब्रॉड (417) तर इयन बॉथम (383) विकेट्ससह तिसऱ्या स्थानी आहेत.
10. इंग्लंडसाठी डावात सर्वोत्तम कामगिरी जिम लेकर (10/53) यांच्या नावावर आहे. मॅचमध्ये सर्वोत्तम प्रदर्शनाचा विक्रमही (19/90) जिम लेकर यांच्याच नावावर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
11. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम अॅलिस्टर कुकच्या (156) नावावर आहे.
12. इंग्लंडसाठी कसोटीत आतापर्यंत 686 खेळाडू खेळले आहेत.
13. इंग्लंड संघानं आतापर्यंत 61 ठिकाणी कसोटी सामने खेळले आहेत.
14. इंग्लंडची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 'अॅशेस' नावानं प्रसिद्ध आहे. इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला 'बेसिल डी ओलिव्हरा' यांचं नाव देण्यात आलं आहे.
15. भारताविरुद्धची मालिका भारतात असताना 'अँथनी डीमेलो' नावानं तर इंग्लंडमध्ये असताना 'टायगर पतौडी' यांच्या नावानं आयोजित केली जाते.
16. इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिका 'विस्डेन ट्रॉफी' नावानं ओळखली जाते.
17. इंग्लंड क्रिकेट संघाला प्रत्येक सामन्यात समर्थन करणारी 'बार्मी आर्मी' प्रसिद्ध आहे.
इंग्लंडची हजाराव्या कसोटीपर्यंत वाटचाल
इंग्लंडची कामगिरी
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








