18 वनडेत 1000 धावा : व्हिव रिचर्ड्सला मागे टाकणारा कोण हा पाकिस्तानचा फखर झमन?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पाकिस्तानच्या फखर झमनने वनडे क्रिकेटमध्ये कमीत कमी मॅचेसमध्ये हजार धावांचा पल्ला गाठण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
झिम्बाब्वेविरुद्धच्या बुलावयोमध्ये सुरू असलेल्या पाचव्या वनडेत फखरने हा रेकॉर्ड केला. या मॅचमध्ये फखरने 10 चौकार आणि एका षटकारासह 83 चेंडूत 85 धावांची खेळी केली.
या आधी कमीत कमी मॅचेसमध्ये 1000 धावा करण्याचा रेकॉर्ड व्हिव रिचर्डस (वेस्ट इंडिज), केव्हिन पीटरसन (इंग्लंड), जोनाथन ट्रॉट (इंग्लंड), क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), बाबर आझम (पाकिस्तान) यांच्या नावावर होता. या सगळ्यांनी 21 डावांत 1000 धावांचा पल्ला गाठला होता.
या यादीत आणखी पुढे गेलं की भारतातर्फे विराट कोहली आणि शिखर धवन यांची नावं सापडतात. कोहली आणि धवन यांनी आपापल्या 24व्या इनिंगमध्ये हजारवा रन केला होता.
28 वर्षांच्या या सलामी फलंदाजाने गेल्या वर्षी ICC चँपियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करताच चार डावांमध्ये 252 रन केले होते. त्यावेळी अंतिम सामन्यात 106 बॉमध्ये 114 धावा करत झमनने पाकिस्तानला भारतावर विजय मिळवून दिला होता.झिंबाब्वेविरुद्धच्या या मालिकेत झमनचं झंझावत सुरूच आहे. एकूण पाच सामन्यात त्याने 60, 117*, 43*, 210* आणि 85 धावा करत एकून 515 रन जमवले आहेत.
शुक्रवारी झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या विक्रमी वनडेत फखरने नाबाद 210 धावांची मॅरेथॉन खेळी करून पाकिस्तानकडून पहिलं वनडे द्विशतक झळकवलं होतं.

फोटो स्रोत, Twitter
या सामन्यात फखरने इमाम उल हकच्या साथीनं 304 धावांची तडाखेबंद सलामी दिली होती. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे.
या भागीदारीच्या बळावरच पाकिस्तानने आपली सर्वोच्च धावसंख्या 399 पर्यंत मजल मारली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








