विक्रमी वनडे : पाकिस्तानची सलामीला 300 धावांची भागीदारी, झमनचं पहिलं द्विशतक

पाकिस्तान, झिम्बाब्वे, वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट, खेळ

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, फखर झमन आणि इमाम उल हक

फखर झमन आणि इमाम उल हक या पाकिस्तानच्या सलामी जोडीने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 304 धावांची विक्रमी भागीदारी रचली. याआधी पहिल्या विकेटसाठीचा सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड 286 धावांचा होता, जो श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि उपुल थरंगा या जोडीच्या नावावर होता.

सोबतच या वनडे सामन्यात आणखी दोन विक्रम रचले गेले.

फखर पाकिस्तानतर्फे द्विशतक झळकावणारा पहिलावहिला खेळाडू ठरला. आणि सलामीच्या भागीदारीत फखर झमनच्या या द्विशतकाच्या बळावर पाकिस्तानने 399 धावांची मजल मारली. हा पाकिस्तानचा सर्वोच्च सांघिक स्कोअर आहे.

फखर झमन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फखर झमन

झिम्बाब्वेच्या बुलावेयो शहरात होत असलेल्या या चौथ्या वनडेत 40व्या षटकात वेलिंग्टन मासाकाटझाच्या गोलंदाजीवर फखरने चौकार लगावला आणि या जोडीने नवा विक्रम रचला.

या आधीची विक्रमी भागीदारी जयसूर्या आणि थरंगा यांनी इंग्लंडविरुद्ध लीड्स केला होती.

फखरचा भागीदार इमाम उल हकने 122 चेंडूत 8 चौकारांसह 113 धावा केल्या. इमामचं वनडे क्रिकेटमधलं हे पहिलंच शतक आहे.

इमाम उल हक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इमाम उल हक

दरम्यान ब्लेसिंग मुझाराबानीच्या गोलंदाजीवर चौकार खेचत फखर झमनने पाकिस्तानकडून पहिलंवहिलं वैयक्तिक वनडे द्विशतक झळकावलं. एकंदर वनडे क्रिकेटमधलं हे आठवं द्विशतक आहे.

त्याने 156 चेंडूत 24 चौकार आणि 5 षटकारांच्या साह्याने नाबाद 210 धावांची मॅरेथॉन खेळी केली.

पण पाकिस्तानला आजही 400चा जादुई आकडा गाठता आला नाही. पण टीमची यापूर्वीची 385 ही वनडे क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या ओलांडत त्यांनी आज 399 रन केले. आता झिम्बाब्वेला 400 धावांचं आवाहन आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)