बाळाला रॅंपवर स्तनपान देणारी मॉडेल म्हणते, 'यात काय नवं'

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील मियामी येथे सुरू असलेल्या एका फॅशन शोमध्ये एका मॉडेलने रॅंपवर कॅटवॉक करताना बाळाला स्तनपान दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
'स्पोर्ट्स इल्सट्रेटेड'च्या वार्षिक स्विमसूट शोच्या वेळी मारा मार्टिन या मॉडेलने आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला स्तनपान दिलं.
"बाळाला स्तनपान करणं अगदीच नैसर्गिक गोष्ट आहे. कॅटवॉक करताना स्तनपान दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांत माझी बातमी पाहून धक्का बसला. हे मी रोजच करते," असं त्यांनी आपल्या इन्स्टा हँडलवर म्हटलं आहे.
अनेक नेटिझन्सनी मारा यांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. मारा यांनी अतिशय प्रेरणादायी भूमिका घेतली असं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र लक्ष वेधून घेण्यासाठी मारा यांनी असं केल्याचं काहींचं म्हणणं आहे.
ओपन कास्टिंगद्वारे मारा यांची या शोसाठी निवड झाली होती. फायनलसाठी 16जणींची निवड झाली होती.
गोल्ड कलरच्या बिकिनीमध्ये त्या कॅटवॉकसाठी अवतरल्या. त्यावेळी त्या बाळाला स्तनपान देत होत्या.
कॅटवॉकवेळी सुरू असलेला संगीताचा मोठा आवाज आणि प्रेक्षकांची गडबड याचा त्रास होऊ नये, म्हणून बाळाच्या कानाला हेडफोन लावण्यात आले होते.
आईने बाळाला स्तनपान करण्यात बातमी होण्यासारखं काय आहे, असं प्रश्न त्यांनी विचारला आहे. इन्स्टाग्रामवर अनेकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे.
हे किती प्रेरणादायी आहे, प्रचंड आवडलं अशा शब्दांत काहींनी भावना व्यक्त केल्या आहेत. हे धाडस केल्याबद्दल धन्यवाद, स्तनपानात सहजपणा आणल्याबद्दल आभारी आहे असंही काहींनी म्हटलं आहे.
मात्र काही नेटिझन्सला हे आवडलेलं नाही. तुम्हाला जगाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही असं वागला नसतात असं काहींनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








