इंडोनेशिया : बदला घेण्यासाठी गावकऱ्यांनी 300 मगरी ठार केल्या

इंडोनेशिया, प्राणी, दुर्मीळ प्रजाती

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, संतप्त गावकऱ्यांनी तब्बल तीनशे मगरींना मारल्याची धक्कादायक घटना घडली.

इंडोनेशियातील पश्चिम पापुआ प्रदेशातील एका गावात मगरीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा जीव गेला. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी परिसरातल्या तब्बल तीनशे मगरींना ठार केलं.

पोलीस आणि अधिकाऱ्यांना या संतप्त जमावाला रोखता आलं नाही. मात्र आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

दुर्मीळ प्रजातींमध्ये गणना होणाऱ्या प्राण्यांना ठार केल्यास इंडोनेशियात जबर दंड ठोठावला जातो किंवा तुरुंगवासाची शिक्षा होते.

शुक्रवारी सकाळी एक गावकरी मगर प्रजनन अभयारण्य असलेल्या परिसरात भाज्या गोळा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यावर मगरींनी हल्ला केला, त्यात मृत्यू झाला.

"एक गावकरी मदतीसाठी ओरडत असल्याचं आमच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं. तो तिकडे धावत गेला. एका मगरीने त्या माणसावर हल्ला केला होता," अशी माहिती इंडोनेशिया नॅचरल रिर्सोसेस कॉन्झर्व्हेशन एजन्सी या संस्थेच्या प्रमुखांनी दिली.

ठार झालेल्या मगरी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, ठार झालेल्या मगरी

मगरींच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या या व्यक्तीवर शनिवारी अंत्यसंस्कार झाले. पण त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी चाकू, सुरे, कुऱ्हाडी, हातोडे, फावडं अशा तमाम हत्यारांसह हे मगर प्रजनन केंद्र गाठलं.

संतप्त जमावाने सुरुवातीला प्रजनन केंद्राच्या कार्यालयाला लक्ष्य केलं. मग त्यांनी एकेक करत या केंद्रातील 292 मगरींची हत्या केली.

दुर्मीळ प्रजातींमध्ये गणना होणाऱ्या सॉल्टवॉटर आणि न्यू ग्युनी मगरींच्या संवर्धनासाठी हे केंद्र काम करत होतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)