व्हीडिओ : तुम्हाला फेसबुकची चटक लागावी म्हणून हजारो इंजिनिअर्स 'हे' करत आहेत

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : फेसबुक तुम्हाला व्यसनाधीन बनवतं आहे का?

आपल्या 'प्रॉडक्ट'चं व्यसन ग्राहकांना लागावं यासाठी सोशल मीडिया कंपन्या शिस्तबद्ध प्रयत्न होत असल्याचं उघड झालं आहे. सिलीकॉन व्हॅलीस्थित कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी बीबीसी पॅनोरमा कार्यक्रमात याविषयी माहिती उघड केली.

'वागणं सर्वस्वी बदलून टाकेल असं जणू काही कोकेन घेऊन इंटरफेसवर विखरुन टाकल्यासारखं आहे हे. म्हणूनच तुम्हाला त्या विशिष्ट साइटवर पुन्हा पुन्हा यावसं वाटतं', असं मोझिला आणि जॉबोनचे माजी कर्मचारी अझा रस्किन यांनी सांगितलं.

"तुमच्या फोनच्या स्क्रीनवर अवतरणारा प्रत्येक इंटरफेस आकर्षक व्हावा यासाठी अक्षरक्ष: शेकडो इंजिनियर्स राबत असतात. तुम्हाला त्या विशिष्ट साइटची सवय लागावी हाच त्यांच्या कामाचा हेतू असतो", रस्किन सांगतात.

2006 मध्ये रस्किन यांनी इन्फिनिटी स्क्रोल नावाचं अॅप तयार केलं. सोशल मीडियातील वेगवेगळ्या साइटची सवय लागावी हा त्यामागचा उद्देश होता. त्यावेळी ते काँप्युटवरर आधारित कन्स्टलटन्सीसाठी काम करत होते.

थायलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुम्हाला फेसबुकचं व्यसन लागलंय का?

इन्फिनिट स्क्रोलमध्ये वाचकांना, प्रेक्षकांना क्लिक न करता स्वाइप डाऊनचा पर्याय मिळतो.

"तुम्ही तुमच्या मेंदूला भावनांवर विचार करण्याचाही वेळ दिला नाहीत, तर माणूस अकारण स्क्रोल करतच राहतो. अनोख्या क्लृप्त्यांद्वारे युजर अधिकाअधिक वेळ स्क्रीन पाहात राहील याची तजवीज केली जाते."

सामान्यत: युजरने जेवढा वेळ स्क्रीन पाहण्यात घालवला पाहिजे त्यापेक्षा हा वेळ जास्त असतो.

सोशल मीडिया, फेसबुक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फेसबुक हे लोकप्रिय समाजमाध्यम आहे.

लोकांना सोशल मीडिया इंटरफेसचं व्यसन लागावं असा माझ्या कामाचा उद्देश कधीच नव्हता. त्यामुळे मला आता अपराधी वाटतं आहे, असं रस्किन यांनी सांगितलं.

पण ते हेही नोंदवतात की, हल्ली अनेक डिझायनर्स फक्त इंटरफेसचं सवयरुपी व्यसन लोकांना लागावं यासाठी नियुक्त केले जातात

"निधी पुरवठ्याचा ओघ कायम राहावा, स्टॉकची किंमत बाजारात वाढत राहावी यासाठी लोकांनी अॅपवर व्यतीत केलेला वेळ वाढत राहणं आवश्य असतं आणि त्यासाठीच हे सगळं केलं जातं. आकड्यांवर एवढा भर असतो, त्यावेळी लोकांना खिळवून ठेवण्यासाठी नवनवीन शक्कली लढवल्या जातात", रस्किन सांगतात.

वाया जाणारा वेळ

फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्याने यासंदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडला.

सोशल मीडिया आणि स्लॉट मशीन यांच्यात खूप साम्य आहे, असं सँडी पॅराकिलास यांनी सांगितलं. फेसबुकला रामराम केल्यानंतर त्यांनी फेसबुक वापरणं सोडून दिलं.

"सिगरेट सोडल्यावर जसं वाटतं तसं मला वाटलं." फेसबुकमध्ये वर्षभर काम करत असताना व्यसनरूपी सवयीचा धोका जाणवल्याचं त्यांनी सांगितलं.

सोशल मीडिया, फेसबुक
फोटो कॅप्शन, अझा रस्किन फेसबुकसाठी काम करायचे

"हे प्रॉडक्ट आणि सेवा यांची व्यसनासारखी सवय होत असल्याचं आता हळूहळू लोकांना समजू लागलं आहे. लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी अनेक कल्पना अमलात आणल्या जातात. लोकांच्या आवडीनिवडींनुसार जाहिराती सादर केल्या जातात" , ते म्हणाले.

दरम्यान लोकांना आपले मित्र, नातेवाईक, हितचिंतक यांच्याशी कनेक्ट होण्याकरता फेसबुकची निर्मिती करण्यात आली आहे. लोकांना साइटची सवय होऊन त्याचं व्यसन लागावं असा विचार आमच्या डोक्यात नाही, असं फेसबुकने बीबीसीला सांगितलं. कुठल्याही स्टेजला हा विचार आमच्या डोक्यात नव्हता, असंही फेसबुकनं सांगितलं आहे.

परिणामकारक लाइक्स

सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी 'लाइक्स'चं महत्त्व मोठं असतं. थम्ब्सअपचे अंगठे, हार्ट किंवा रीट्वीट यापैकी एकाद्वारे पसंती दर्शवली जाते.

फेसबुकवरच्या लाइक पर्यायाच्या संयुक्त संशोधक लिआ पर्लमन यांनी लाइक्समागची भूमिका मांडली. लाइक्सवरून व्हर्च्युअल माध्यमातली पत समजत असल्याचं पर्लमन यांनी सांगितलं.

सोशल मीडिया, फेसबुक
फोटो कॅप्शन, लिह पर्लमन यांनी चार वर्ष फेसबुकमध्ये काम केलं

त्या पुढे म्हणतात, "समाजाचं काय म्हणणं आहे याला पुष्टी हवी असेल तर मी फेसबुकवर जाते."

"मला एकटं वाटतंय, जरा फोन चेक करते. मला असुरक्षित वाटतंय... मग फोन हातात येतो." फेसबुक सोडल्यानंतर फेसबुक वापरणं सोडून देण्याचा प्रयत्न केल्याचं पर्लमन यांनी सांगितलं.

"मी पूर्वी पोस्ट केल्यानंतर जेवढ्या लाइक्स मिळत असत, त्यात घट झालेली पाहायला मिळाली. तेव्हा मलाही फेसबुकचं व्यसन जडल्यासारखं वाटलं."

अस्वस्थ युवा वर्ग

सोशल मीडियाच्या अतिवापराचा नैराश्य, एकटेपणा आणि अन्य मानसिक आजारांशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं आहे.

इंग्लंडमध्ये तरुण मंडळी आठवड्याला 18 तास फोनवर, विशेषत: सोशल मीडियावर व्यतीत करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सोशल मीडिया, फेसबुक
फोटो कॅप्शन, फेसबुकचं व्यसन सुटावं यासाठी रस्कीन प्रयत्न करत आहेत.

"सोशल मीडिया एक प्रकारचा प्रॉब्लेम आहे हे ज्या तरुणांना लक्षात आलं आहे त्यांनी अशा अॅप्सपासून दूर राहण्याचा विचार करायला हवा", असं पर्लमन यांनी सांगितलं.

"मन दुसऱ्या कशात तरी म्हणजे सभोवतालच्या चालताबोलत्या गुंतवणं आवश्यक आहे", असंही ते सांगतात.

इंटरनेटवर एखादा युझर जेवढा वेळ व्यतीत करतो त्यापैकी सर्वाधिक वेळ तो फेसबुकवर असेल यासाठी प्रयत्नशील असल्याचं गेल्या वर्षी फेसबुकचे संस्थापक अध्यक्ष सीन पार्कर यांनी स्पष्ट केलं होतं.

माणसाच्या मानसिकतेतला हळवा कोपरा हुडकून काढत आहोत, असा दावाही त्यांनी त्या वेळी केला होता.

लाइक बटन एक प्रकारचं व्यसन व्हावं असा विचार डोक्यातही नव्हता, असं पर्लमन यांनी सांगितलं. सोशल मीडिया वापराचे अनेक फायदेही असल्याचं त्या सांगतात.

फेसबुक जाणीवपूर्वक युझर्सना आपल्याकडे खिळवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप पार्कर यांनी केला होता. त्याविषयी फेसबुकचे सध्याचे पदाधिकारी इम आर्चिबोंग यांना विचारलं. आम्ही याप्रकरणाचा अभ्यास करत आहोत असं त्यांनी सांगितलं.

"सवयी कशा लागतात, सवयींचं व्यसनात कसं रुपांतर होतं यासंदर्भात आम्ही स्वतंत्र कंपन्यांशी चर्चा करत आहोत. आमच्या साइटवर किंवा एकूण इंटरनेटवरचं कुठलं वागणं नेटिझन्सकरता धोक्याचं ठरू शकतं याचा अभ्यास सुरू आहे. नेटिझन्सच्या सुरक्षेसाठी काय करता येईल यावरही संशोधन सुरू आहे."

"गेल्या सात दिवसात फेसबुकवर किती वेळ व्यतीत केला याची नोंद ठेवणारं फीचर फेसबुक स्वत: विकसित करत आहे. व्यतीत होणाऱ्या वेळेवर मर्यादा असावी यावर काम सुरू आहे."

लोकांना सोशल मीडियावर आकृष्ट करण्यासाठी रंग, आवाज आणि सुखद धक्क्यांच्या रुपात दिली जाणारी बक्षिसं यांचा बीबीसी पॅनोरमा तपशीलवार अभ्यास करत आहे.

ट्वीटरने यासंदर्भात वक्तव्य करण्यास नकार दिला.

स्नॅपचॅटनं त्यांच्या अॅपचा वारंवार वापर व्हावा यासाठीच्या प्रयत्नांना त्यांचा सपोर्ट असल्याचं सांगितलं. पण त्यासाठी काही व्हिज्युअल ट्रिक्स वापरत असल्याचं त्यांनी नाकारलं. त्यांच्या अॅपवर यूजर्सनी अकारण घोटाळत राहावं अशी आमची अजिबात इच्छा नाही, असंही स्नॅपचॅटतर्फे सांगण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)