रमजान ईद : मुस्लीम धर्मीयांच्या या सणाला जगभरात अशी रंगते खाद्ययात्रा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आहमेन ख्वाजा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आज जगभरातले मुस्लीम रमजान ईद साजरी करत आहते. ईदचा सण म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ. तिखट खमंग पदार्थ जिव्हा तृप्त करतात तर गोड पदार्थ मनाला सुखावतात. ईदच्या निमित्ताने जगभरात तयार होणाऱ्या काही खास पदार्थांची ही मांदियाळी.
दक्षिण आशिया- शीर कुर्मा
शीर कुर्मा सेविया नावानेही ओळखल्या जातात. भाताच्या शेवयांपासून हा गोड पदार्थ तयार केला जातो. दूध आणि बदाम यांच्या मिश्रणातून शीर खुर्मा बनतो.
भारत, पाकिस्तान, बांगलादेशसह आशियाई उपखंडातील देशांमध्ये शीर खुर्मा तयार केला जातो.
भाताच्या शेवया दुधात शिजवल्या जातात. त्यानंतर या शेवया थंड केल्या जातात. सुकामेवा आणि वेलची पेरल्यानंतर शीर खुर्मा खाण्यासाठी तयार होतो.

फोटो स्रोत, Richard Lautens/Getty Images
रशिया - मँन्टी
रशियात तयार होणारा मँन्टी हा पदार्थ आपल्या मोदकांसारखा असतो. लॅम्ब किंवा बारीक केलेलं बीफ यापैकी एक घेऊन त्याचा कणकेसारखा गोळा केला जातो. बटर किंवा सोअर क्रीमच्या बरोबरीने मँन्टी खवैय्यांना दिलं जातं.
विविध प्रदेशांमध्ये मँन्टी वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. रशियात मुस्लिमांचा संख्या 15 टक्के आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चीन - सँझी
चीनमध्ये 20 कोटी 30 लाख मुस्लीम राहतात. ईद साजरी करताना ते पारंपरिक सँझी नावाचा पदार्थ तयार करतात. कणकेपासून विशिष्ट सोऱ्यामधून काढल्या जातात. हा न्याहरीचा पदार्थ आहे. हे मिश्रण नूडल्ससहित तळून पिरॅमिडच्या आकाराचे तयार करून पेश केले जातात.
खमंग असा हा सँझी चीनमधल्या क्षिनजिआंग प्रांतातल्या उघिर मुस्लीम सुपरमार्केट्समध्ये मिळतो.

फोटो स्रोत, Getty Images
मध्यपूर्व - कुकीज
खजुराची पेस्ट, तुकडे केलेले अक्रोड, पिस्ते यांच्या मिश्रणावर पिठीसाखर भुरभुरवली जाते.
मध्यपूर्वेत ईदच्या कालावधीत या खमंग आणि खुसखुशीत पदार्थाला प्रचंड मागणी असते. वेगवेगळ्या प्रदेशांत या पदार्थाला वेगवेगळी नावं आहेत. हा पदार्थ सीरियात मामाऊल, इराक क्लाईचा तर इजिप्तमध्ये कहक नावाने ओळखला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
इंडोनेशिया - केटूपॅट
इंडोनेशियात कुकीज आणि न्याहरीच्या अन्य पदार्थांच्या बरोबरीने केटूपॅट नावाचा पारंपरिक पदार्थ तयार केला जातो. नारळाच्या झावळ्यांमध्ये लपेटलेला भाताचा हा पदार्थ असतो.
हा पदार्थ ओपोर अयाम (नारळाच्या ग्रेव्हीमध्ये शिजवलेलं चिकन), सांबल गोरंग केटांग (बटाट्याच्या बरोबरीने बीफ/चिकन लिव्हर मिरचीच्या पेस्टमध्ये शिजवलेला पदार्थ) सोबत देतात.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्लंड - बिर्याणी
इंग्लंडमध्ये ईदच्या दिवशी पारंपरिक बिर्याणी तयार केली जाते. भाज्या, मटण आणि भाताचं मिश्रण असलेली बिर्याणी काकडी किंवा योगर्टच्या बरोबरीने सादर केली जाते.
इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येपैकी पाच टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इथिओपिया - इन्जेरा
ईदच्या निमित्ताने सोमालियात कॅम्बाबूर नावाचा पोळी-भाकरीसारखा पदार्थ तयार केला जातो. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तो चवीन खाल्ला जातो. हा पदार्थ साखर पेरून किंवा योगर्टच्या बरोबरीने मांडला जातो. इथिओपियात हा पदार्थ इन्जेरा नावाने ओळखला जातो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








