प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी शाही विवाह सोहळ्यात अशा मोडल्या प्रथा

फोटो स्रोत, Getty Images
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्जेस चॅपलमध्ये संपन्न झाला. त्या दोघांनी एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्वीकार केला. मात्र, शाही विवाह सोहळ्यात शपथ घेताना मेगन मार्कल यांनी पतीच्या सगळ्या आज्ञांचं पालन करीन अशी शपथ घेतली नाही. तर, अंगठी घालून प्रिन्स हॅरी यांनी राजघराण्याची आजवरची परंपराही मोडली.
विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्जेस चॅपल मध्ये या सोहळ्यासाठी राणी एलिझाबेथ आणि 600 निवडक आमंत्रित उपस्थित होते.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 1
हे ठरलं वेगळेपण...
1. बोहल्यापर्यंतचं बरंचसं अंतर मेगन यांनी स्वतः पार केलं. ख्रिश्चन प्रथेनुसार वडील अथवा वडीलधारा पुरुष नवऱ्या मुलीला दरवाजातून बोहल्यापर्यंत घेऊन जातो आणि मुलाच्या हातात तिचा हात देतो. पण मेगनचे वडील उपस्थित राहू शकले नाहीत. अर्ध्या वाटेत पोहोचल्यावर हॅरीचे वडील प्रिन्स चार्ल्स यांनी मेगन यांना बोहल्यापर्यंत साथ दिली.
2. शाही विवाह सोहळ्यात शपथ घेताना मेगन मार्कल यांनी पतीच्या सगळ्या आज्ञांचं पालन करीन अशी शपथ घेतली नाही. मेगन आणि हॅरी यांनी एकसारख्याच आणा-भाका घेतल्या. मग दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठी घालून आणखी एक परंपरा मोडली. प्रथेनुसार राजघराण्यातील पुरुषांना लग्न झाल्याची निशाणी म्हणून अंगठी घालणं बंधनकारक नाही.
3. मेगन यांनी परिधान केलेला लग्नाचा पोषाख हा ब्रिटीश डिझायनर क्लेअर वाईट केलर यांनी तयार केलेला होता. गेल्या वर्षीच क्लेअर यांची गिवेन्ची प्रसिद्ध फ्रेन्च फॅशन ब्रँडच्या कलात्मक संचालकपदी नेमणूक झाली. हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.
4. या दोघांच्या लग्नाच्या निमित्तानं धार्मिक प्रवचन देण्याचा मान अमेरिकन बिशप मायकल करी यांना मिळाला. करी यांनी आपल्या प्रवचनात मार्टिन ल्यूथर किंग यांच्या शिकवणूकीचा उल्लेख केला. शिकागोमध्ये जन्मलेले मायकल करी हे समानतेचे पुरस्कर्ते आहेत. सामाजिक न्याय, समलिंगी व्यक्तींचे अधिकार, लैंगिक अत्याचारांविरोधी चळवळ, वर्णभेदाविरोधी लढाई यांचा पुरस्कार करणारे विचार त्यांनी अनेकदा मांडले आहेत. शिकगोमध्ये जन्मलेले मायकल करी हे अमेरिकन एपिस्कोपल चर्चचे मुख्य बिशप असून या पदावर पोहोचणारे ते पहिलेच कृष्णवर्णीय बिशप आहेत.

फोटो स्रोत, PA
मेगन यांच्या आई आफ्रिकन अमेरिकन असून त्या समूदायातील अनेक लोक याच चर्चचे अनुयायी आहेत. तर ब्रिटिश राजघरणं हे चर्च ऑफ इंग्लंडचे अनुयायी आहेत. राणी एलिझाबेथ या चर्चच्या प्रमुख आहेत. हॅरी आणि मेगनच्या विवाहानिमित्तानं या दोन्ही चर्चचे अनुयायी एकाच ठिकाणी प्रार्थना करताना दिसले.
5. या सोहळ्यात मग कॅरेन गिब्सन आणि अन्य कॉयर सिंगर्सनी 'स्टँड बाय मी' हे गाणं गायलं. 'सोल' संगीतातलं मोठ नाव असलेले गायक बेन. ई. किंग यांनी अजरामर केलेल्या या गाण्याचं अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या लढ्याशी नातं आहे. अनेक समान हक्कांच्या चळवळींचं गीत म्हणून या गाण्याची ओळख आहे
या विवाहानंतर या जोडप्याला ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखलं जाईल.
प्रिन्स हॅरी यांची आई डायना यांची बहीण लेडी जेन फिलोव्स याही या विवाह सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
या नवविवाहीत जोडप्यानं रजिस्टरवर सह्या केल्यानंतर 19 वर्षीय शेकू कॅन्नेह मॅसन यांनी सुमधूर संगीत वाजवून सोहळ्यात रंगत आणली.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 2
विवाहानंतर ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स म्हणजेच नवविवाहीत जोडपं विंडसर परिसरातल्या हाय स्ट्रीट, शीट स्ट्रीट, किंग्स रोड, अल्बर्ट रोड या मार्गावरून फिरत आहे.

फोटो स्रोत, EPA
या संपूर्ण मार्गावर जवळपास 1 लाख चाहते त्यांचं अभिनंदन करण्यासाठी जमले होते.
फुटबॉलपटू डेव्हीड बेकहॅम आणि पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम, ऑप्रा विनफ्रे आदी या सोहळ्याला उपस्थित आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या दिग्गजांसह 600 आमंत्रित पाहुणे या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्जेस चॅपेल इथे हा सोहळा पार पडला.
प्रिन्स हॅरी यांना 'अर्ल ऑफ डंबार्टन' आणि 'बॅरोन किलकील' हे किताब मिळाले आहेत.
हा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारोंनी चाहते विंडसर कॅसल परिसरात सकाळपासून दाखल झाले आहेत. तर, शेकडोंनी आदल्या दिवशी रात्रीपासून चांगली जागा पटकावण्यासाठी विवाहस्थळ गाठले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









