पाहा व्हीडिओ - जब हॅरी मेट मेगन - एक शाही लव्ह स्टोरी

व्हीडिओ कॅप्शन, जब हॅरी मेट मेगन

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही लग्नाची जगभरात उत्सुकता आहे. 19 मे रोजी विंडसरमधल्या सेंट जॉर्ज चॅपेल इथं हे लग्न होणार आहे.

जुलै 2016 कॉमन मित्राच्या मदतीनं दोघं ब्लाइंड डेटवर भेटले होते. त्यानंतर पुढे त्यांच्यामधील भेटीगाठी वाढत गेल्या.

लंडनमध्ये पहिल्यांदा मेगनला भेटण्यापूर्वी ती काय करते हे हॅरींना माहिती नव्हतं. तिचा टीव्ही शो सुद्धा त्यांनी पाहिला नव्हता.

नोव्हेंबर 2017 मध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगनचा साखरपुडा पार पडला असून येत्या शनिवारी म्हणजेच 19 मेला हे 'लव्ह बर्ड्स' लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)