You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खेळता खेळता मरणं आणि मरता मरता खेळणं...
सीरियातलं गृहयुद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशात तिथल्या लहान मुलांच्या वाट्याला सर्वांत खडतर आयुष्य आलं आहे. जेव्हा त्यांना चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या भावनांना अशी वाट करून दिली.
सीरियातल्या 14 वर्षांखालील मुलांनी ही चित्रं काढली आहेत. ज्या विदारक परिस्थितीतून ते जात आहेत त्याचं प्रतिबिंब यात दिसत आहे.
या फोटोत अनेक किस्से आहे. असद एअर फोर्स, अँब्युलन्स, मुलांचा खून इत्यादी. संयुक्त राष्ट्रांच्या मते खान शेखाऊन शहरात झालेल्या रासायनिक हल्ल्यात सीरिया सरकारचा हात होता. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला होता आणि त्यात मुलांची संख्या वाढली आहे.
या चित्रात रडवेले डोळे आहेत. त्यात लिहिलं आहे, बेला सिरिया.
या चित्रात एका इमारतीवर झालेला हवाई हल्ला दाखवला आहे. मशिन गननं गोळ्या झाडणारे सैनिकही त्यात आहेत. त्यांच्यावर लिहिलं आहे, हे विरोध रोखणारे सैनिक आहेत- त्यांच्यासाठी राष्ट्र, सन्मान, आणि निष्ठा हेच सगळं काही आहे.
अतिशय उदास दिसणाऱ्या एका मुलानं लिहिलं आहे, "हे सीरिया आहे."
युद्धजन्य परिस्थितीमुळे अर्ध्याहून अधिक सीरियाची जनता विस्थापित झाली आहे.
'माझा देश' 2011 पासून आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त सीरियायी लोकांना अटक झाली आहे किंवा बेपत्ता झाले आहेत.
या चित्रात एका मुलानं आपल्या बहिण भावांची नाव लिहली आहेत. पिंजऱ्यांच्या माध्यमातून युद्धाच्या परिस्थितीचं कथन केलं आहे. मुलानं लिहिलं आहे, माझे वडील 2010 मध्ये, माझे वडील 2011 मध्ये आणि माझे वडील 2014 मध्ये.
14 वर्षांच्या मइय्यासार यानं या चित्रात आपलं आणि बहिणीचं चित्र रेखाटलं आहे. मइय्यासारनं लिहिलं आहे, दोन वर्षांआधी आमचे वडील आम्हाला सोडून गेले. आम्हाला त्यांच्याविषयी काहीही माहिती नाही. ही माझी आतापर्यंतची सगळ्यांत वाईट आठवण आहे.
हे चित्र सिरीयातलं मुख्य शहर होम्सचं आहे. त्यात शहराच्या क्लॉक टॉवरची आधीची आणि आताची परिस्थिती दाखवली गेली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)