या गावातले लोक आपली शवपेटी स्वतःच बनवून पर्वतांवर टांगतात

सागडा
    • Author, माईक डिल्गर आणि रिको हिझॉन
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

जो जन्माला आला त्याचं मरण निश्चित आहे. माणसाच्या जन्माची चाहूल आधीच लागलेली असते, एक अंदाजे वेळही कधीकधी माहिती असते. म्हणून त्याच्या आगमनाची तयारीही केली जाते.

मृत्यूचं मात्र सगळंच अनिश्चित. वेळ कुणालाच माहीत नसते. कुठे येणार हेही सांगता येत नाही. पण जर मृत्यू निश्चितच असेल तर त्याची तयारी का केली जात नाही?

कारण कदाचित माणूस नेहमीच आपल्या मृत्यूला घाबरत असतो. जे लोक मोकळ्या मनाने मृत्यूचा स्वीकार करतात ते त्यासाठीची तयारीही करतात.

प्रत्येक समाजात, धर्मात, प्रांतात अंत्यसंस्काराच्या विविध प्रथा आहेत. काही धर्मांत मृतदेहांना अग्नी दिला जातो तर काही ते धर्मांत दफन केले जातात. पण एक समाज असाही आहे जिथे मृतदेहांना डोगरांमध्ये लटकवून ठेवलं जातं.

शवपेटी

फोटो स्रोत, Getty Images

फिलिपीन्सच्या उत्तेरस तिथलं सर्वांत मोठं आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेलं बेट म्हणजे लुझॉन. या बेटावरच्या कॉर्डिलेरा सेंट्रल पर्वतांमध्ये सगाडा नावाचं एक गाव आहे. शतकांपासून या गावात इगोरोट जमातीचे लोक राहतात, ज्यांनी या गावाला 'लटकणाऱ्या शवपेट्यांचं गाव' अशी ओळख मिळाली आहे.

फिलिपीन्सची राजधानी मनिलापासून सगाडापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास आठ तास लागतात. इथपर्यंत जाणारा रस्ता फारच खराब आहे. आणि या रस्त्यावर तुम्हाला थरकाप उडवणारी दृश्यं आणि प्रथापरंपरा पाहायला मिळतील.

सगाडामध्ये दोन हजार वर्षांपासून एक परंपरा सुरू आहे - इथले लोक आपली शवपेटी स्वतःच बनवतात. ती दफन केली जात नाही तर ती उंच पर्वतांच्या खडकांवर लटकवली जाते.

पण का?

प्रेत

फोटो स्रोत, Getty Images

स्थानिकांमध्ये अशी मान्यता आहे की हवेत लटकणारी ही प्रेतं इथल्या लोकांना त्यांच्या मृत पूर्वजांच्या जवळ नेतात.

प्रथेनुसार वृद्ध लोक स्वतःची शवपेटी या जंगलात मिळणाऱ्या लाकडापासून बनवून ठेवतात. ही शवपेटी मग रंगवली जाते. त्या पेटीच्या एका बाजूला मृताचं नाव आणि पत्ता लिहिलेला असतो.

डेथ चेअरच्या शवपेट्या

मृतदेह या शवपेटीत ठेवण्यापूर्वी आत एक खुर्ची ठेवली जाते, जिला 'डेथ चेअर' म्हटलं जातं. या खुर्चीला द्राक्षांच्या वेली आणि एक घोंगडी बांधलेली असते.

मृतदेहांना या शवपेटीत लटकवल्यानंतर पुढे अनेक दिवस मृतांचे नातेवाईक तिथं येत असतात. काही दिवसांनंतर मृतदेह सडू लागतो. पण मृतदेह द्राक्षांच्या वेलींनी वेढलेला असल्याने तो सडत असल्याची जाणीव होत नाही.

पू्र्वी अशा शवपेट्या फक्त एक मीटर लांबीच्या असायच्या. मृतदेह खुर्चीवर बसवून लोक शेवटचं दर्शन घ्यायचे. त्यानंतर ही खुर्ची शवपेटीत अशा पद्धतीने बसवली जायची की मृतदेहातील सर्व हाडं मोडली जायची. त्यामुळे मृतदेह या भ्रूणावस्थेत बसायचा.

असं मानलं जात असे की माणूस जन्माला भ्रूणरूपात असतो, त्यामुळे मरतानाही त्यानं त्याच रूपात असलं हवं. पण नंतर शवपेटीची लांबी दोन मीटर करण्यात आली.

लटकवलेले मृतदेह

मृतहेद या पेटीत ठेवण्यापूर्वी त्याच्या भोवती विशिष्ट प्रकारची पानं गुंडाळलेली असतात. मग डोंगरांच्या कडांवर ही शवपेटी लटकवण्यापूर्वी या कडांवर मोठे खिळे ठोकले जातात.

जेव्हा ही पेटी या खिळ्यांवर लटकवण्यासाठी ओढली जाते तेव्हा या पानांतून रस गळू लागतो. अंत्यविधीसाठी आलेले लोक हा रस आपल्या शरीरावर झेलतात. हे शुभ मानलं जातं.

फिलिपीन्स ते इंडोनेशियापर्यंत प्रथा

इतिहास सांगतो की ही प्रथा फक्त फिलिपीन्समध्येच नाही तर चीन आणि इंडोनेशियातही अनेक भागांत होती. आता ही प्रथा फक्त सगाडामध्येच आहे.

या प्रथेमुळे सागाडा गाव आता पर्यटनस्थळ बनलं आहे. पर्वतांवरील हे कब्रस्थान पाहण्यासाठी दूरवरून लोक येतात. त्यामुळे गावाची आर्थिक परिस्थितीही सुधारली आहे.

असंही म्हणू शकतो की इथल्या लोकांनी मृत्यूनंतरही आपल्या वंशजांसाठी अच्छे दिनांची तरतूद करून ठेवली आहे.

हे पाहिलं का?

व्हीडिओ कॅप्शन, मादागास्कर : मृतांना पूर्वायुष्याचा अनुभव यावा यासाठी त्यांची प्रेतं बाहेर काढतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)