You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा फोटो : स्टीफन हॉकिंग - एका संघर्षाची अखेर
जगद्विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मोटर न्युरॉन या दुर्धर आजाराशी लढा देत 76व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. आधुनिक आणि 20व्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ लोकांमध्ये त्यांची गणना होते.
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 1942 रोजी झाला होता. त्यांनी आधी ऑक्सफोर्ड आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात विश्वविज्ञानाचं (Cosmology) शिक्षण घेतलं.
वयाच्या 21व्या वर्षी त्यांना मोटर न्युरॉन हा दुर्धर आजार झाला. त्याच वेळी त्यांची पहिली बायको जेन (वरील छायाचित्रात) यांच्याशी लग्न करण्याची तयारी करत होते. स्टीफन जास्त काळ जगणार नाही, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. ते 26 वर्षं एकत्र राहिले आणि त्यादरम्यान त्यांना तीन मुलंही झाली.
ते व्हीलचेअरचा वापर करायचे आणि व्हॉइस सिंथेसायझर शिवाय त्यांना बोलता येत नव्हतं. स्टीफन यांनी लिहिलेल्या A Brief History of Time या पुस्तकामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या पुस्तकाच्या एक कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या.
हे थोर शास्त्रज्ञ 'डेझर्ट आयलंड डिस्क्स' या बीबीसी 4 च्या रेडिओच्या शोमध्ये सू लॉले यांच्याबरोबर 1992 झळकले होते. त्यांना कस्टर्ड खूप आवडायचं.
हॉकिंग यांनी पुढे चालून एलेन मेसन या त्यांच्या नर्सशी लग्न केलं. 11 वर्षं एकत्र राहिल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.
2004 साली बेनेडिक्ट कंबरबॅश यांनी स्टीफन हॉकिंग यांची भूमिका पहिल्यांदा साकारली. बीबीसीतर्फे सादर करण्यात आलेल्या 'हॉकिंग' चित्रपट प्रचंड नावाजला गेला.
2007 साली झीरो ग्रॅविटीचा अनुभव देणाऱ्या विमानातून त्यांनी प्रवास केला. असा अनुभव घेणारे ते पहिले दिव्यांग व्यक्ती ठरले. "जर माणूस अवकाशात गेला नाही तर त्याचं भविष्य अंधारात असेल," असं वक्तव्य त्यांनी तेव्हा केलं होतं.
स्टीफन हॉकिंग यांनी अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्यानं द्यायचे. वरील चित्रात 2008 साली ते जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात व्याख्यान देताना.
2008 साली हॉकिंग यांनी नेल्सन मंडेलांची जोहान्सबर्गमध्ये भेट घेतली. आपल्या कामासाठी ते एवढे प्रसिद्ध होते की त्यांनी जागतिक नेत्यांची भेट घेतली होती.
त्यांना गणित आणि विज्ञान क्षेत्रांतले अनेक पुरस्कार मिळाले होते. 2009 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कारानं सन्मानित केलं.
मग 2014 साली त्यांनी इंग्लंडच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली.
त्यांच्या आयुष्यावर 'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग' हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला. त्यात एडी रेडमन यांची त्यांची मुख्य भूमिका साकारली होती.
2017 साली त्यांनी त्यांच्या हाँगकाँगस्थित चाहत्यांशी होलोग्रामच्या माध्यमातून संवाद साधला. हा होलोग्राम त्यांच्या केंब्रिजच्या कार्यालयातून थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यांच्या निधनानंतर 'त्यांचा गौरवशाली वारसा अनेक वर्षं राहील', असं वक्तव्य त्यांच्या मुलांनी केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)