You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेपाळमध्ये बांगलादेशी विमानाला अपघात, किमान 49 मृत्युमुखी
नेपाळच्या काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवर उतरत असताना झालेल्या अपघातात किमान 49 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
विमान कोसळल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. या विमानात वैमानिक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 71 जण होते. त्यापैकी 67 प्रवासी होते. त्यात 33 नेपाळी आणि 32 बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय मालदिव आणि चीनचा प्रत्येकी एक प्रवासी विमानातून प्रवास करत होते.
सुरुवातीला 8 प्रवासी बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली होती. नंतर या आठही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजण्यात येत आहे. 22 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. अशी माहिती नेपाळ पोलीस दलाचे प्रवक्ता मनोज नोपेन यांनी माहिती दिली.
अपघात कसा घडला?
ढाका इथून आलेल्या या विमानाला स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून वीस मिनीटांनी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणं अपेक्षीत होतं.
विमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या विमानाला विमानतळाच्या दक्षिण धावपट्टी उतरायचं होतं. पण विमान उत्तर भागातील धावपट्टीकडे गेलं.
विमान धावपट्टीच्या बाहेर गेले आणि जवळच्याच फुटबॉल मैदानात विमानाने क्रॅश लँडिंग केली.
या विमान अपघातातून वाचलेले बसंत बोहरा यांनी माहिती दिली की, विमानाने जवळपास लँडिंग केली होती. त्याचवेळी एक मोठा धमाका झाला आणि विमान थरथरयला लागलं. नंतर विमान डाव्याबाजूला वळालं. बघता बघता विमानाने पेट घेतला.
यूए बांगला एअरलाइन्सचं ढाका ते काठमांडू दरम्यानचं विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरलं आणि विमानतळाच्या पूर्व भागात कोसळलं. अशी माहिती काठमांडू पोस्टनं दिली आहे.
अपघातस्थळावर लागलेली आग विझवण्याचं काम अग्निशमन दलातर्फे सुरू असल्याची माहिती माय रिप्ब्लिका या वेबसाइटनं दिली आहे.
अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे लोट येताना दिसत होते. काही प्रवाशी विमानातून बाहेर पडल्याचं विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केली असून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत
अपघातात काही लोक जखमी झाले आहेत. प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती नेपाल पोलीस दलाचे प्रवक्ते मनोद नेपाने यांनी अपघात घडल्यानंतर सुरूवातीच्या तासांत बीबीसी नेपाळीशी बोलताना दिली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती विमानतळाचे सुरक्षा अधिकारी आणि सरव्यवस्थापक राज कुमार छेत्री यांनी कळविली.
सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या विविध पोस्टमध्ये फोटो आणि माहिती शेअर करण्यात आली आली. त्यात अपघातस्थळावरून उठलेले धुराचे लोट दिसत आहेत.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, हे विमान S2-AGU, बंब्बार्डियअर डॅश 8 Q400 या श्रेत्रीचं आहे. पण त्याविषयी अधिकृत पुष्टी मिळू शकलेली नाही.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटच्यानुसार हे विमान स्थानिक वेळानुसार दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)