कोका कोला आता दारूही विकणार!

कोका कोला आपल्या 125 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दारू तयार करणार आहे. जपानमधल्या 'अल्कोपोप'च्या धर्तीवर हे पेय कोका कोला आणणार आहे.

सध्या देशात चु ही (Chu-Hi) या कॅनमधल्या पेयाचं प्रस्थ वाढत आहे. चु ही या पेयात शोचू नावाचं एक स्थानिक मद्य मिसळलं जातं, ज्याने थोडी झिंग चढते.

3 ते 8 टक्के अल्कोहोल असलेल्या या पेयाचा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.

आम्ही हा प्रयोग एका विशिष्ट वर्गापुरता करत आहोत, असं कोका कोलाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

हायबॉल

"आम्ही कमी अल्कोहोल असलेल्या कोणत्याही उत्पादनाचा बाजारात केलेला हा पहिलाच प्रयोग आहे. आमच्या कोषाबाहेर आम्ही कसे प्रयोग करत आहोत, याचं हे एक उदाहरण आहे," असं कोका कोलाचे जपान अध्यक्ष जॉर्ज गार्डुनो म्हणाले.

Chu-Hi हे Shochu Highball चा शॉर्ट फॉर्म आहे. ते बिअरला पर्याय म्हणून विकलं जात होतं आणि स्त्रियांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

जपानच्या किरीन, सनट्रॉय आणि असाही, यासारख्या मोठ्या ब्रँड्सकडे या वर्गात मोडणारी दारू आहे. आणि ते अजूनही वेगवेगळ्या प्रकारांबरोबर ते प्रयोग करत असतात.

प्रिमिअम सेगमेंट

आजकालचे तरुण आरोग्याबाबत अधिक सजग होत चालले आहेत. मग सोडा असलेल्या पेयांपासून कोका कोला थोडी फारकत घेत अनेक प्रयोग करत आहेत, जसं की चहा ब्रॅँड आणि पॅकेज्ड पेयजल.

पण गेल्या नोव्हेंबर 'वेल्स फारगो'चे विश्लेषक बोनी हारझॉग यांनी असा अंदाज बांधला की कोका कोला आता दारूचं उत्पादन करेल, कारण ते आता प्रौढांसाठी क्राफ्ट पेयांसारख्या प्रिमिअम वर्गाकडे लक्ष देत आहेत.

अल्कोपॉप (Alcopop) म्हणजे एक गोड अल्कोहोलिक पेय असतं. 1990 च्या दशकात यूकेमधील हूच, रीफ, स्मरनॉफ आईस, बकार्डी बिअर हे अतिशय लोकप्रिय झाले आहेत.

पण त्यांच्यावरूनही वाद झाला. असे आरोप झाले की ही पेय सहज उपलब्ध असल्यामुळे तरुणांना दारू पिण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल.

पण भारतात हे पेय उपलब्ध होणार का?

कोका कोला जपानचे अध्यक्ष जॉर्ज गार्डुनो यांनी सांगितलं की, हे पेय जपानच्या बाहेर विकण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)