You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा गॅलरी: गेल्या तीस वर्षांत ऑस्कर रेड कार्पेटवरची बदललेली फॅशन
ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा 4 मार्च रोजी होणार आहे. मेरिल स्ट्रीप आणि डॅनियल डे लेविस यांना नामांकन मिळालं आहे. त्यांना ऑस्कर मिळणार की नाही याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण सर्वांत जास्त लक्ष लागलेले आहे ते रेड कार्पेटकडे. 30 वर्षांत सेलिब्रिटींची 'स्टाइल' कशी बदलली यावर टाकलेली एक नजर.
2008 सालचा ऑस्कर सोहळा (80वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा)
मारिअन कॉटिलार्ड
दहा वर्षांपूर्वी मारिअन कॉटिलार्डला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्या वेळी तिने जॉन पॉल गॉल्टिअरचा कुटूर ड्रेस घातला होता.
जॉर्ज क्लुनी
हॉलिवुड अभिनेता जॉर्ज क्लुनी आणि त्याची तत्कालीन प्रेयसी साराह लार्सन. क्लुनीने पारंपरिक टक्सिडो परिधान केला होता.
सर्शी रोनान
2008 साली सर्शे रोनान केवळ 13 वर्षांची होती. त्या वेळी तिला अटोनमेंट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळालं होतं.
कॅमेरून डिअॅझ
2008 साली कॅमेरून डिअॅझने ख्रिश्चन डिओरने बनवलेला ड्रेस घातला होता.
डॅनिअल डे लेविस
डॅनिअल डे लेविसला 2008 साली 'देअर विल बी ब्लड' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
जेसिका अल्बा
जेसिका अल्बाने ऑस्कर सोहळ्यासाठी 'मर्चेसा'ने बनवलेला ड्रेस घातला होता.
केट ब्लॅंचेट
केट ब्लॅंचेटने ड्राइज व्हॅन नोटेनचा ड्रेस घातला होता. ती त्यावेळी गरोदर होती. त्यावेळी तिला दोन नामांकनं मिळाली होती.
शॉन कोम्ब्स
शॉन कॉम्ब्सने टक्सिडो घातला होता. त्याच्या पेहरावाची स्तुती एस्क्वायर नियतकालिकाने केली होती.
टिल्डा स्विंटन
फ्रेंच फॅशन हाउस लॅनिवनने बनवलेला ड्रेस तिने घातला होता.
जेनिफर हडसन
जेनिफरने रॉबर्टो कॅव्हिल्लीचा ड्रेस घातला होता. 2007मध्ये जेनिफरला ड्रीमगर्ल्ससाठी ऑस्कर मिळाला होता.
1998ला काय 'ट्रेंड' होता? (70वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा)
केट विन्सलेट
टायटॅनिक चित्रपटातील केट विन्सलेटची भूमिका गाजली होती. अलेकझांडर मॅकक्वीनने बनवलेला ड्रेस घालून ती या सोहळ्याला आली होती.
रॉबिन विल्यम्स
रॉबिन विल्यम्सला 'गुड विल हंटिंग'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
टायरा बॅंक्स
टायरा बॅंक्स ही प्रसिद्ध मॉडल आहे. अमेरिकन डिजायनर हाल्स्टनने बनवलेला ड्रेस तिनं घातला होता.
हॅले बेरी
1998ला झालेल्या सोहळ्यासाठी हॅले बेरीने हा आकर्षक ड्रेस घातला होता.
चेर
बॉब मॅकी या डिजायनरने बनवलेला ड्रेस चेरनं घातला होता.
जॅक निकोलसन
1998 साली निकोलसनने टक्सि़डो घातला होता. 'अॅज गुड अॅज इट गेट्स'मधील भूमिकेसाठी निकोलसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
आता आपण 1988ला 'फॅशन' कशी होती ते पाहू?
चेर
डिजायनर बॉब मॅकीने बनवलेला ड्रेस चेरने घातला होता. हा ड्रेस घालून फॅशन जगतात तिने एक वेगळा मापदंड निर्माण केला असं म्हटलं जातं.
जेनिफर ग्रे आणि पॅट्रिक स्वेझ
दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि त्यांनी दोघांनी मिळून सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार द लास्ट एम्पररला दिला होता.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
हे पाहिलंत का?