You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रेडिओ निवेदिकेनं कसा दिला बाळाला 'ऑन-एअर' असताना जन्म?
रुग्णवाहिकेत किंवा सार्वजनिक ठिकाणी बाळाला जन्म दिल्याचं आपण नेहमी ऐकतो, पण आठवड्याभरापूर्वी एका महिलेनं लाईव्ह रेडिओ शोदरम्यान म्हणजेच ऑन एअर असताना आपल्या बाळाला जन्म दिला आहे.
अमेरिकेची रेडियो प्रेजेंटर कॅस्सीडी प्रॉक्टरनं लाईव्ह रेडिओ शो दरम्यान आपल्या मुलाला जन्म दिला. अमेरिकेतल्या सेंट लुईसच्या 'द आर्क' नावाच्या रेडिओ स्टेशनच्या प्रेजेंटरसाठी ही खास तयारी करण्यात आली होती.
सोमवारी प्रॉक्टर यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. त्यानंतर रेडिओ स्टेशननं रुग्णालयातूनच त्यांचा कार्यक्रम प्रसारीत करण्याचा घाट घातला.
लाईव्ह रेडिओ कार्यक्रम रुग्णालयातून प्रसारित करण्यासाठी सर्व तायरी आधीच करण्यात आली होती.
बीबीसीशी बोलताना प्रॉक्टर यांनी सांगतलं की,"त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. दिलेल्या तारखेच्या आधीच बाळाचा जन्म झाला."
प्रॉक्टरनं सांगितलं की, "मुलाला लाईव्ह शोमध्ये जन्म देणं माझ्या कामाचाच एक भाग असल्यासारखं होतं. मी दररोज माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या श्रोत्यांसोबत शेअर करायचे."
प्रॉक्टरनं आपल्या मुलाचं नाव जेमिसन असं ठेवलं आहे. श्रोत्यांनी सुचवलेल्या नावांमधूनच तिनं हे नाव ठेवलं आहे.
मुलाचा जन्म होण्याआधीच त्याचं नाव काय ठेवायचं यासाठी रेडिओवर वोटिंग घेण्यात आलं होतं. प्रोग्राम डायरेक्टर स्कॉट रॉडी यांनी रिवरफ्रंट टाइम्स वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की "या दांपत्यानं निवडलेल्या १२ नावांवर आम्ही वोटिंग सुरू केलं होतं. जेमिसनचा जन्म होईपर्यंत हे वोटिंग सुरू होतं."
प्रॉक्टर यांच्या को-होस्टनं या शोला 'एक अद्भुत, विलक्षण क्षण' असल्याचं म्हटलं आहे. प्रॉक्टर आता काही दिवसांसाठी आपल्या शो पासून दूर राहणार आहेत. त्या आता प्रसूतीच्या रजेवर गेल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)